घरCORONA UPDATECovid- 19 ची लक्षणं नसलेल्या लोकांची तपासणी होणे आवश्यक - WHO

Covid- 19 ची लक्षणं नसलेल्या लोकांची तपासणी होणे आवश्यक – WHO

Subscribe

कोविड -१९ च्या डब्ल्यूएचओ तंत्रज्ञानाच्या प्रमुख Maria Van Kerkhove यांनी पत्रकार परिषदेत काही मुद्दे स्षष्ट केले आहेत.

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या संक्रमण झालेल्या बाधितांची संख्या लक्षात येण्यासाठी लोकांची कोरोना चाचणी करायला पाहिजे. यासह ज्या लोकांना कोरोनाची लक्षणं नाहीत अशा लोकांची देखील चाचणी केली पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी सांगितले. ही भूमिका अमेरिकेच्या धोरणात अलिकडे झालेल्या बदलांच्या उलट आहे. यापूर्वी, यूएस हेल्थ एजन्सीने आपले धोरण बदलून असे म्हटले होते की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या मात्र त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नसतील तर त्यांची चाचणी करण्याची गरज नाही.

कोविड -१९ च्या डब्ल्यूएचओ तंत्रज्ञानाच्या प्रमुख Maria Van Kerkhove यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोरोनाची चाचणी वाढविण्यात यावी आणि ज्यामध्ये कोरोना संक्रमणाची लक्षणे सौम्य आहेत किंवा ती उपस्थित नाही, याची माहिती मिळेल.” ‘अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या धोरणात बदल होण्यापूर्वी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना असे सांगण्यात आले होते की, संक्रमित लोकांच्या १.८ मीटरच्या आत १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ आलेल्या कोणत्याही व्यक्तीची चाचणी करण्यात येईल. तर आता नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, जर संक्रमित लोकांच्या संपर्कात येणाऱ्यां लोकांमध्ये संसर्गाची लक्षणं नसतील तर त्यांची चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

- Advertisement -

Kerkhove यांनी सांगितले की, “कोरोना चाचणी ही एक संधी म्हणून घेतली गेली पाहिजे जेणेकरुन संक्रमित लोकांना क्वारंटाईन करता येईल आणि त्यांचा संपर्क कोणाशी आला हे शोधता येतील,” तसेच ते म्हणाले की, लोक आता सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत नाहीत ही चिंतेची बाब आहे. Kerkhove यांच्या मते, मास्क घालूनही किमान एक मीटर अंतर राखणे आवश्यक आहे.


विठुरायाच्या चरणांवर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -