घरदेश-विदेशसेना-भाजप युतीचे भवितव्य काय?

सेना-भाजप युतीचे भवितव्य काय?

Subscribe

शिवसेना-भाजप युती होणार का? अमित शहांची शिष्टाई कामी येणार का? उद्धव ठाकरे- अमित शहांमध्ये बंद दाराआड दोन तासांहून अधिक काळ काय चर्चा झाली? याकडे आता सर्वांंचे लक्ष लागून राहिले आहे. पण याबाबत कोणताही तपशील बाहेर आलेला नाही. त्यामुळे सेना-भाजप युती टिकणार का? याप्रश्नाच्या उत्तरासाठी १९ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

शिवसेना -भाजपची युती होणार? अमित शहांची शिष्टाई कामी येणार? उद्धव ठाकरे-अमित शहा यांचे काय बोलणे झाले बंद दाराआड? यासाऱ्या गोष्टींकडे राजकीय पंडितांसह देशातल्या प्रमुख राजकीय पक्षांचे देखील लक्ष लागून राहिलेले आहे. पण, अद्याप मात्र याबाबत कोणताही तपशील बाहेर आलेला नाही. शिवसेना-भाजप युती कायम राहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तासांहून अधिक काळ चर्चा रंगली. मात्र, चर्चा काय झाली? कोणत्या मुद्यावर झाली? शिवसेना – भाजप युती होणार का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी मिळालेली नाहीत.

दोन तासांहून जास्त चालली चर्चा!

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना -भाजप युती व्हावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील हजर होते. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. संध्याकाळी ७.३० वाजता सुरू झालेली चर्चा रात्री १० वाजेपर्यंत सुरू होती. नियोजित वेळेनुसार ८.३० वाजता चर्चा संपणे अपेक्षित होते पण, चर्चा दोन तासांहून अधिक काळ चालली. पहिल्यांदा उद्धव ठाकरे-अमित शहा- आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर बंद दरवाजाआड उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये चर्चा झाली.

- Advertisement -

बंद दाराआड उद्धव ठाकरे-अमित शहा चर्चा

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे नाराज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेपासून लांब ठेवणे पसंत केले. परिणामी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये ‘मातोश्री’च्या दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत चर्चा झाली. यावेळी शिवसेना -भाजप युती कायम राहावी यासाठी अमित शहा यांनी उद्वव ठाकरेंची मनधरणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवाय शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील अमित शहा यांनी केला. ‘मातोश्री’वर येताना अमित शहा मित्रपक्षाची नाराजी दूर करण्यासाठी काहीतरी ठोस ‘प्लॅन’ घेऊन आल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. या सर्व घडामोडी पाहता शिवसेना आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

१९ जुनला शिवसेना स्पष्ट करणार भूमिका?

उद्धव ठाकरे- अमित शहा यांच्या भेटीत काय चर्चा झाली? बंद दाराआड काय बोलणे झाले? शिवसेनेची नाराजी दूर करण्यात अमित शहा यशस्वी झाले का? याबद्दल बोलणे दोन्ही पक्षांनी टाळले आहे. शिवाय शिवसेनेकडून देखील अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे १९ जूनला वर्धापन दिनी शिवसेना युतीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

शिवसेनेचा ‘एकला चलो’चा नारा!

“यापुढे मी युतीचा कटोरा घेऊन जाणार नाही” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी युतीबद्दल आपली भूमिका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी स्पष्ट केली आहे. शिवाय, युती नाहीच याच भूमिकेवर शिवसेना अद्याप तरी ठाम आहे. अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीपूर्वी देखील शिवसेनेने युती नाहीच, असा सूर आळवलेला पाहायाला मिळाला. त्यामुळे अमित शहा यांच्या भेटीनंतर शिवसेना – भाजप युती होणार का? अमित शहा यांची ‘मातोश्री’वारी यशस्वी होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष  लागून राहिले आहे.

‘सामना’ देखील शांत

शिवसेनेची अधिकृत भूमिका ही ‘सामना’ या मुखपत्रातून स्पष्ट होते. पण, उद्धव ठाकरे -अमित शहा भेटीबद्दल देखील ‘सामना’तून कोणतीही भूमिका किंवा ठाकरे – शहा भेटीमध्ये काय चर्चा झाली याबद्दल अवाक्षर ही काढण्यात आलेले नाही. परिणामी शिवसैनिकांसह राजकीय पंडितांना आणखी काही काळ तरी वाट पाहावी लागणार आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -