घरदेश-विदेशगो-एअरच्या दिल्ली-गुवाहाटी विमानाचे विंडशील्ड तुटले, जयपूरमध्ये सुरक्षित उतरवले

गो-एअरच्या दिल्ली-गुवाहाटी विमानाचे विंडशील्ड तुटले, जयपूरमध्ये सुरक्षित उतरवले

Subscribe

बुधवारी उड्डाण सुरू असताना गो-एअरच्या विमानाची विंडशील्ड तुटली. हे विमान दिल्लीहून गुवाहाटीला जात होते. विंडशील्डला तडे गेल्याची माहिती वैमानिकाला मिळाली. मात्र, खराब हवामानामुळे विमान दिल्ली विमानतळावर उतरू शकले नाही. यानंतर त्याला जयपूरला वळवण्यात आले, जिथे त्याला सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

DGCA अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गो-एअरचे G8-151 हे विमान दिल्लीहून गुवाहाटीला जात होते. हे विमान दिल्ली विमानतळावरून 12.40 वाजता निघाले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या विंडशील्डला तडा गेला. वैमानिकाला याची माहिती मिळाल्यावर त्याने दिल्लीत विमान उतरवण्याची परवानगी मागितली. मात्र, येथील हवामान खराब असल्यामुळे ते उतरू शकले नाही. त्यानंतर विमान जयपूरकडे वळवण्यात आले. जिथे त्याला सुरक्षित उतरवण्यात आले.

- Advertisement -

डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाला गुवाहाटी येथे दुपारी 2:55 वाजता उतरायचे होते. मात्र, उड्डाण दरम्यान विमानाचे विंडशील्ड तुटले. यानंतर विमान जयपूरकडे वळवून 3 वाजता त्याचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत ही दिलासादायक बाब आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -