घरदेश-विदेशब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेदरम्यान तरूणीने केला हनुमान चालीसाचा जप; दिल्ली एम्समध्ये यशस्वी उपचार

ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेदरम्यान तरूणीने केला हनुमान चालीसाचा जप; दिल्ली एम्समध्ये यशस्वी उपचार

Subscribe

नवी दिल्लीच्या एम्स (All India Institute Of Medical Science) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ऑपरेशन दरम्यान हनुमान चालीसेचा जप ऐकायला मिळाला. शनिवारी एम्स रूग्णालयात २४ वर्षीय तरूणीची ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यादरम्यान तरूणीने एकच हनुमान चालीसेचा जप करत संकट मोचक हनुमानाची धावा करताना दिसली.

एम्स रूग्णालयात २४ वर्षीय तरूणीची ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया साधारण तीन तास सुरू होती, ही संपूर्ण शस्त्रक्रिया सुरू असताना ही तरूणी शुद्धीतच होती. तिच्यावर रुग्णालयातील न्यूरो सर्जरीच्या अग्रगण्य डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली.या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान, ही तरूणी संपूर्ण वेळ हनुमान चालीसाचे पठण करताना दिसली. या ऑपरेशन टीमचा एक भाग असलेले डॉ दीपक गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरूणी दिल्लीच्या शाहदरा परिसरातील रहिवासी आहे. या तरूणीच्या डोक्यात अनेक भागात ट्यूमर होते, यासाठी तिच्यावर हे ऑपरेशन करण्यात आले. डॉ. गुप्ता यांच्या मते, तरूणीवर ही शस्त्रक्रियेच्या वेळी तिच्या डोक्याच्या वरच्या भागाला सुन्न करण्यासाठी प्रथम भूल देण्याची इंजेक्शन्स देण्यात आले, तसेच वेदना होऊ नये म्हणून काही औषधही तरूणीला देण्यात आले. डॉ. गुप्ता यांनी असे सांगितले की, या तरूणीवर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी तिच्या डोक्यात असलेल्या मज्जातंतू वेगवेगळ्या रंगांनी कोडिंग करण्यात आले होते. ज्याला वैद्यकीय भाषेत ट्रॅक्टोग्राफी म्हणतात. या प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे मेंदूला कमी इजा होते आणि या वेळी रुग्णाला शुद्धीवर ठेवले जाते जेणेकरून मेंदूच्या कोणत्याही महत्त्वपूर्ण भागाला कोणतीही इजा होता कामा नये.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -