आता लष्करात शौर्य गाजवणार महिला पायलट

लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

Women pilots will join the army
आता लष्करात शौर्य गाजवणार महिला पायलट

आपल्याकडे असे कोणतेच क्षेत्र नाही त्यात महिला काम करत नाही. नौदल वायुदलानंतर आता लष्करातही महिला पायलट काम करताना आपल्याला दिसणार आहेत. नौदल आणि वायुदलानंतर आता लष्करदलाने हा निर्णय घेतला आहे. याआधी केवळ आर्मी एव्हगेशन ट्रफिक कंट्रोल विभागात महिला काम करत होत्या मात्र आता महिला लष्कारात पायलट म्हणून भूमिका बजावताना दिसणार आहेत. लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

येत्या जुलै महिन्यापासून लष्करात महिला पायलट काम करताना दिसणार आहेत. जुलै पासून महिलांना पायलटचे प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली जाणार आहे. या प्रशिक्षणात महिला अधिकाऱ्यांनाही ट्रेनिंग दिले जाणार असल्याचे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सांगितले आहे.

गेल्या एक महिना आधीच मी याबाबत आदेश घेतला आहे. आर्मी एव्हगेशन ट्रफिक कंट्रोल विभागात महिला केवळ ग्राऊंड ड्यूटी करत आहेत. त्या महिलांना पायलट म्हणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिला अधिकाऱ्यांना योग्य प्रक्षिण देऊन त्यांना पायलट म्हणून ठेवले जाणार आहे. त्यासाठी जुलै महिन्यात या महिला अधिकांऱ्यांच्या पायलटचे प्रशिक्षण सुरू होईल, असे लष्कर प्रमुख मनोज नरवणे सांगितले आहे. नुकतेच एअर इंडियाच्या महिला पायलटनी एक नवा इतिहास रचला आहे. सॅन फ्रन्सिस्को ते बंगळूर असा १६ किलोमीटरचा सर्वात मोठा हवाई प्रवास करून त्यांनी नवा विक्रम रचला आहे.


हेही वाचा – भयंकर! गर्लफ्रेंडला मोबाईल देण्यासाठी बॉयफ्रेंडने केली मित्राची हत्या