घरदेश-विदेशAyodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जगभरात चर्चा, पाकिस्तानी वृत्तपत्राने घेतली दखल

Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जगभरात चर्चा, पाकिस्तानी वृत्तपत्राने घेतली दखल

Subscribe

Ram Mandir : अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याची संपूर्ण देशभरात चर्चा केली जात आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली गेली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात चर्चा सुरू आहे. या सोहळ्याची देशभरातील वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्राने घेतली दखल

- Advertisement -

पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र ‘द डॉन’ या वृत्तपत्रामध्ये लेखक परवेज हुदभोय यांचा एक ओपिनियन लेख प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे की, येथे आधी पाच दशकं जुनी मशीद होती, आता तिथे राम मंदिर उंभ करण्यात आलं आहे. बाबरी मशीद पाडून उभारण्यात आलेल्या राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (22 जानेवारी) प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. असं पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी लिहिलं आहे.

हेही वाचा… Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ‘या’ काँग्रेस नेत्याची हजेरी; उपस्थित राहण्याचेही सांगितले कारण

- Advertisement -

पाकिस्तानप्रमाणेच अमेरिकेतील मीडियाने देखील दखल घेतली आहे. अमेरिकेतील ब्रॉडकास्टर NBC या न्यूजच म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.22 जानेवारी) राम मंदिराचं उद्घाटन केलं. हे मंदिर सर्वात मोठ्या लोकशाहीत धार्मिक तणावाचं कारण ठरलं आहे. अयोध्येतील राम मंदिर मंदिर हे प्रमुख हिंदू देवता आहे. राम मंदिर 30 लाखांची लोकसंख्या असणाऱ्या अयोध्येला पर्यटनस्थळ बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

ABC न्युजने म्हटलं आहे

ABC न्युजने म्हटलं आहे की, राम मंदिराच्या उद्घाटनाचा फायदा नरेंद्र मोदी यांना होणार आहे. भाजपा अनेक दशकांपासून राम मंदिरासाठी आग्रह करत आहेत.

युएईमधील (United Arab Emirates) गल्फ न्यूज (Gulf News ) या रिपोर्टला शीर्षक देण्यात आलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने अनेक दशकांपासून दिलेलं आश्वासन पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हिंदू राष्ट्रवाद मतदारांमधील त्यांच्या लोकप्रियतेच्या कारणांपैकी एक आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाला ज्या स्तरावर नेलं आहे, त्यामुळे त्यांचे चाहते आहेत. देशाचा विकासदर 7 टक्क्यांहून अधिक आहे.

बीबीसी वर्ल्ड वृत्तपत्राने काय लिहिलं आहे?

बीबीसी वर्ल्डने देखील अयोध्या मंदिराचं वृत्त प्रसारित केलं आहे. बीबीसी वर्ल्डच्या रिपोर्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, राम मंदिराच्या उद्घाटानात उद्योगपती, अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचा सहभाग असला तरी बहुताशं विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. मंदिराच्या उद्घाटनाचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होणार असल्याचे दावा विरोधकांनी केला आहे. बीबीसी वर्ल्डने पुढे लिहिले की, ‘समीक्षकांनीही सरकारवर अशा देशात धार्मिक सण साजरा केल्याचा आरोप केला आहे, जो संविधानानुसार धर्मनिरपेक्ष आहे.’

हेही वाचा… Ram Mandir :  उमा भारती, साध्वी ऋतंभरा एकमेकींना मिठी मारून रडल्या; वाचा सविस्तर

कतारस्थित टीव्ही नेटवर्क अलजजीराने आपल्या लेखात लिहिलं आहे की, भारताची धर्मनिरपेक्षता भगव्या राजकारणाखाली दबली गेली आहे. भारतीय राजकीय विश्लेषक इन्सिया वाहनवती यांनी लिहिलेल्या लेखात असं म्हटलं आहे की, धर्मनिरपेक्ष भारताच्या पंतप्रधानांनी मंदिराचे उद्घाटन करणे अयोग्य आहे. बाबरी मंदिर पाडणे मुस्लिमांसाठी अजूनही वेदनादायक आहे. विध्वंसानंतर झालेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांची आजही आपल्यापैकी अनेकांना आठवण आहे. मशिदीची पुनर्बांधणी केली जाईल, अशी राजकीय आश्वासने देण्यात आली होती, परंतु तसे झाले नाही’.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -