घरदेश-विदेशमुख्यमंत्री व्हायला आवडेल - ज्योतिरादित्य शिंदे

मुख्यमंत्री व्हायला आवडेल – ज्योतिरादित्य शिंदे

Subscribe

होय, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी स्पष्ट कबुली काँग्रेसच्या मध्य प्रदेशातील विजयाचे शिल्पकार ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे.त्यामुळे आता पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

होय, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी स्पष्ट कबुली काँग्रेसच्या मध्य प्रदेशातील विजयाचे शिल्पकार ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. मध्य प्रदेशात भाजपचा पराभव केल्यानंतर सपा आणि बसपाच्या साथीनं काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदी कमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे असा सवाल विचारला जात आहे. सध्या तरी कमलनाथ यांचं पारडं जड दिसून येत आहे. पण, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी स्पष्ट आणि उघड कबुली काँग्रेसचे नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता काँग्रेसचं नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपचा पराभव करत काँग्रेसनं मध्य प्रदेशमध्ये ११४ जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी भाजपला १०९ जागा मिळाल्या. मध्य प्रदेशातील निकाल हाती यायला तब्बल २४ तास लागले. यानंतर काँग्रेसनं बाजी मारल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर काँग्रेस आत्ता सत्ता स्थापन करणार असून मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ यांचं नाव आघाडीवर आहे. तर, ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी स्पष्ट कबुली दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाकडे लक्ष लागून राहिले आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. शिवाय, मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या विजयामध्ये देखील ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करता ज्योतिरादित्य मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसणार का? हे पाहावं लागणार नाही.

तर, राजस्थानमध्ये सध्या अशोत गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची चुरस पाहायाला मिळत आहे.

वाचा – मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ; राजस्थानमध्ये कोण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -