घरदेश-विदेशमोबाईलने केला घात, बॅटरीचा स्फोट होऊन तरुण जखमी

मोबाईलने केला घात, बॅटरीचा स्फोट होऊन तरुण जखमी

Subscribe

उत्तरप्रदेशातील रानीगंज गावात घडली घटना

अनेकांसाठी मोबाईल म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल हा जवळ लागतोचं. मात्र तुम्हीही सतत मोबाईल जवळ बाळगात असाल तर सावध. कारण एका तरुणाने पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलाचा अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तरुणाा गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात भर्ती करण्यात आले.

उत्तर प्रदेश लखीमपूर खेरी भागातील रानीगंज गावातील ही घटना आहे. तर कुलवंत सिंह असे मोबाईल स्फोटात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुलवंत सिंह याने काही दिवसांपूर्वीच इंटेल या कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल तो नेहमी पँटच्या खिशात घेऊन फिरायचा. मात्र अचानक पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. काही कळायच्या आतचं त्याच्या पँटने पेट घेतला. या आगीने त्याची मांडीला गंभीर दुखापत झाली.

- Advertisement -

या स्फोटामुळे घाबरलेल्या कुलवंतने खिशात हात टाकत मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे त्याचा हात गंभीर भाजला. यामुळे कुलवंतच्या हात आणि पाय या स्फोटात गंभीर स्वरुपात भाजला गेला. त्यामुळे कुलवंतला तात्काळ जवळच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे रानीगंज गावातील मोबाईल वापरकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -