घरदेश-विदेशकोरोनाचा फटका; 'या' कंपनीने घेतला १३ टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय!

कोरोनाचा फटका; ‘या’ कंपनीने घेतला १३ टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय!

Subscribe

जूनपासून पुढच्या सहा महिन्यांपर्यंत कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये ५० टक्के कपात करण्यात येईल

कोरोना व्हायरस महामारीमुळे देशभर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. ऑनलाईन फूड अग्रेसर असणारी कंपनी झोमॅटोने कोरोना संकटादरम्यान आपल्या १३ टक्के कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झोमॅटोने हा निर्णय जाहीर केला असून जूनपासून पुढच्या सहा महिन्यांपर्यंत कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये ५० टक्के कपात करण्यात येईल, असे देखील सांगितले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, कोरोना व्हायरसमुळे भारतीय अर्थव्यवस्था ही ढासळत चालली आहे. एवढेच नाही तर यामुळे अनेक व्यवसाय बंद करण्यास देखील भाग पाडले आहे. याचाच फटका झोमॅटो कंपनीला देखील बसला आहे. म्हणून कंपनीकडून असा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी या संदर्भात झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना संस्थापक आणि सीईओ यांच्याकडून एक नोटीस पाठवण्यात आली, त्यात असे स्पष्ट केले की, ‘आम्हाला आमच्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. ही आमची इच्छा आहे. मात्र भविष्यात सर्व कर्मचाऱ्यांसाठी काम उपलब्ध करून देणे शक्य नाही.’ दरम्यान, येत्या २४ तासांत ज्यांची नोकरी गेली आहे त्यांना टीम लीडर्सकडून झूम कॉल येईल, तसेच ज्यांची नोकरी टिकली आहे. त्यांना कंपनीच्या एचआरकडून मेल पाठवण्यात येईल, असे कंपनी कडून सांगण्यात आले आहे.


सरकारने ‘EPF’मध्ये केली कपात; जाणून घ्या कर्मचारी, कंपनी आणि ईपीएफओवर होणारा परिणाम

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -