घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाहेमंत पाटील यांनी सजावटीतून सांगितली राधा-कृष्णाची प्रेम कहाणी

हेमंत पाटील यांनी सजावटीतून सांगितली राधा-कृष्णाची प्रेम कहाणी

Subscribe

मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन घरोघरी झाले. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा गणेशोत्सवाच्या सजावटीत आधुनिकतेचा साज वाढत गेला. तेल-तुपाच्या दिव्यांची जागा चायनीज इलेक्ट्रिक तोरणांनी घेतली. पानाफुलांच्या सजावटीची जागा, थर्माकोलच्या मखरांनी घेतली. पण आजही आगरीकोळी कुटुंबात गणेशोत्सव पूर्णतः पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. भिंतीवर, कापडावर नैसर्गिक रंगांनी रंगबेरंगी पानाफुलांची चित्रे रंगवून गणरायाची त्यात प्रतिस्थापना करण्याची पद्धत आगरीकोळी समाजात फार पूर्वीपासून आहे. हीच पारंपरिक कला वळगाव, भिवंडीचे कलाकार हेमंत प्रभाकर पाटील ह्यांनी जोपासली आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतीने सजावट करत कृष्णा व राधाचे प्रेम दर्शवले आहे.

Hemant patil celebrating eco friendly ganeshotsav


स्पर्धकाचे नाव – हेमंत प्रभाकर पाटील
पत्ता – वळगाव भिंवडी, ठाणे.


- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -