घरसंपादकीयदिन विशेषकायदे पंडित मोतीलाल नेहरू

कायदे पंडित मोतीलाल नेहरू

Subscribe

मोतीलाल गंगाधर नेहरू यांचा आज स्मृतिदिन. मोतीलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक श्रेष्ठ पुढारी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक-सदस्य आणि कायदे पंडित होते. त्यांचा जन्म 6 मे 1861 रोजी आग्रा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेत्री येथे, तर पुढील शिक्षण कानपूर व अलाहाबाद येथे झाले. बी. ए. ला असताना त्यांनी शिक्षण सोडले आणि वकिलीची परीक्षा दिली (१८८३).

प्रथम काही वर्षे कानपूरला उमेदवारी केल्यानंतर ते अलाहाबादला नंदलाल यांच्या हाताखाली वकिली करण्यासाठी आले. सुरुवातीस त्यांनी वकिली व तत्संबंधित विषय यापलीकडे दुसर्‍या कशातही फारसे लक्ष दिले नाही. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होमरूल लीगच्या स्थापनेनंतर १९१७ मध्ये झाली. या वेळी बेझंटबाईंच्या बाजूने ते सरकारविरुद्ध उभे राहिले. अलाहाबाद होमरूल शाखेचे ते अध्यक्ष झाले.

- Advertisement -

यानंतर काही वर्षांतच जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी भारतीयांची अमानुष कत्तल केली. या हत्याकांडाच्या काँग्रेसनियुक्त चौकशी समितीचे ते सदस्य होते. तत्पूर्वी आपली मते स्वतंत्रपणे मांडण्याकरिता त्यांनी इंडिपेंडंट नावाचे वृत्तपत्र सुरू केले (फेब्रुवारी १९१९). अमृतसर काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले (१९१९). त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली व त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. १९२० च्या नागपूर काँग्रेसने असहकाराच्या चळवळीचा पुरस्कार केला व इतर कार्यकर्त्यांप्रमाणे मोतीलाल यांनीही विलासी वृत्ती टाकून सर्व बाबतींत स्वदेशीचा अवलंब केला. वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीस वाहून घेतले. अशा या थोर कायदे पंडिताचे ६ फेब्रुवारी १९३१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -