घरसंपादकीयदिन विशेषसूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आनंद चक्रवर्ती

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आनंद चक्रवर्ती

Subscribe

आनंद मोहन चक्रवर्ती हे भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९३८ रोजी कोलकाता येथे झाला. कोलकाता येथील रामकृष्ण मिशन विद्यामंदिर आणि सेंट झेविअर महाविद्यालयात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. न्यूयॉर्क येथील शेनेक्टडीमधील जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागात काम करत असताना तेलाचे खंडन करणारा नवीनच जीवाणू स्यूडोमोनास हा त्यांनी जनुक-अभियांत्रिकी या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशाळेत तयार केला.

तेलाचे खंडन करणार्‍या सूक्ष्मजीवांच्या चार प्रजाती त्यावेळी अस्तित्वात होत्या, परंतु तेलात या जंतूंना सोडल्यावर एकमेकांमधील स्पर्धेमुळे तेलाच्या खंडन प्रक्रियेला मर्यादा निर्माण झाल्या. तेलाचे खंडन करणारी जनुके प्लाझमीडच्या सहाय्याने या चार प्रजातींमध्ये एकमेकात हस्तांतरित होऊ लागली. जनुकांची ही अस्थिर वागणूक ही खरी समस्या आहे हे चक्रवर्ती यांनी ओळखले. त्यांनी अशा प्लाझमीड हस्तांतरणामुळे परिवर्तीत झालेल्या जीवाणूंना जंबुपार किरणांचा मारा करून तेलाचे खंडन करणार्‍या चार जनुकांना एकाच जीवाणूत स्थिर करून एका नव्याच जीवाणूची निर्मिती केली. त्या जीवाणूला स्यूडोमोनास पुटिडा म्हणून ओळखले जाते.

- Advertisement -

या जंतूंची तेलाचे खंडन करण्याची क्षमता दुपटीने वाढल्याचे त्यांनी सिद्ध केले. २००१ मध्ये त्यांनी सी.डी.जी. थेराप्युटिक्स नावाची कंपनी डेलावेर येथे स्थापन केली. त्यांच्या अमृता थेराप्युटिक्स नावाच्या जैव-औषधनिर्मिती कंपनीत कर्करोग आणि सार्वजनिक आरोग्याला घातक अशा आपल्या शरीरात निर्माण होणार्‍या जीवाणू निर्मित पदार्थांचा सामना करण्यासाठी उपचार, लस आणि निदान पद्धती विकसित केल्या जातात. अशा या थोर शास्त्रज्ञाचे १० जुलै २०२० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -