घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहींचि नेणिजे । हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां? ॥
तशातून देवा, तुमचे चरित्र अगाध! आम्हास काही कळत नाही. तेव्हा आपण म्हणता ते खोटे आहे असे तरी आम्ही एकदम कसे म्हणावे?
परी हेचि मातु आघवी । मी परियेसें ऐशी सांगावी । जे तुवांचि रवी केवीं । पाहीं उपदेशु केला ॥
तेव्हा मी सूर्याला उपदेश केला हे जे आपण म्हणता ते मला समजेल अशा रीतीने स्पष्ट सांगा.
तंव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्या वेळेस तो सूर्य होता, त्या वेळेस आम्ही नव्हतो अशी जरी तुझ्या मनात शंका आली,
तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हा तुम्हासी । बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपुलीं तूं ॥
तरी तुला हे माहीत नाही, की तुझे व माझे पुष्कळ जन्म झाले; परंतु तुझ्या जन्मांची तुला आठवण नाही.
मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥
अर्जुना, मी ज्या ज्या वेळेस जे जे अवतार घेतले, त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे.
म्हणोनि हे आघवें । मागील मज आठवें । मी अजुही परी संभवें । प्रकृतियोगें ॥
म्हणून मला मागील सर्व गोष्टीचे स्मरण आहे. मी जन्मरहित असनूही मायेच्या योगाने अवतार घेतो;
माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिबें मायावशें । माझ्याचि ठायीं ॥
माझे अव्ययत्व नाहीसे होत नाही. पण अवतार घेणे व तो संपविणे हे जे भासते, ते मायेच्या योगाने माझ्या ठिकाणीच भासते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -