घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ॥
ज्यांच्या इंद्रियांचे दैन्य पार नाहीसे झाले आहे, त्यालाच हे तात्विक भाषण ऐकण्याचा अधिकार आहे.
हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु । होईल श्लोकसंगति भंगु । म्हणौनियां ॥
[मग श्रोते ज्ञानेश्वरास म्हणतात] ‘अहो, हे विषयांतर पुरे करा; कथेचा संबंध सोडू नका; कारण श्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल.
जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥
जे मनाने समजण्यास अवघड व विचार करूनही बुद्धीला न सापडणारे, ते दैवाच्या अनुकूलतेमुळे तुम्हाला सांगता आले.
जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें । कथा सांगैं ॥
जे मुळीच बोलता येत नाही, ते जर बोलण्यात सापडले, तर आणखी उपाय कशास पाहिजेत! परंतु, हे असो; आता कथा सांगा.’
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥
ऐकणार्‍याची ही उत्कट इच्छा जाणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, दोघांचा संवाद जो एवढा वेळ ऐकला, त्याचे मनन करून पुढे तोच ऐका.
मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥
मग श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले, पूर्ण ब्रह्मनिष्ठेला ओळखण्याचे खरे चिन्ह कोणते, ते मी सांगतो, चांगले लक्ष दे.
तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला । तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ॥
हे पहा आत्मज्ञानाने जो पूर्ण भरला व ज्याला कर्मफळाचा अगदी वीट आला, त्याला या जगामध्ये घरी बसल्याने शांती येऊन वरते. ( प्राप्त होते.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -