घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जगाच्या जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होय जाये । तो शुद्धीही नेणे ॥
पहायला लागले तर या जगात प्राणिमात्राच्या ठिकाणी हा आहे, परंतु केव्हाही कोणाचा नसतो आणि हे जगत् उत्पन्न होते व लयास जाते, याची त्याला वार्तादेखील नसते!
पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखे । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी?॥
पापपुण्य सर्व त्याच्या जवळ असूनही तो पाहत नाही, इतकेच नव्हे, तर त्याला साक्षिभूतसुद्धा नसतो; मग दुसर्‍या गोष्टीबद्दल कशाला विचारावे?
पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥
परंतु मूर्ती धारण करून तो देहाच्या बरोबर खेळतो, (अवतार घेऊन जगामध्ये वावरतो) परंतु त्या प्रभूचे निराकारपण मोडत नाही.
तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं । तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥
असे असता अर्जुना, तो चराचर सृष्टी उत्पन्न करतो, पालन करतो आणि संहार करतो, असे जे लोक म्हणतात, ते सर्व अज्ञानामुळे म्हणतात, असे समज.
तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मसैरें फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । मज ईश्वराचें ॥
ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते, तेव्हा भ्रमरूप काळोखी नाहीशी होते; असे झाले म्हणजे मग ईश्वराचे अकर्तेपण स्पष्ट समजून येते.
एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता । तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥
अशाप्रकारे ईश्वर हा अकर्ता आहे अशी जर मनाची खात्री झाली, तर तोच मी आहे हे पूर्वीपासून सिद्धच आहे; (तेव्हा अर्थात मीही अकर्ता आहे हे सिद्धच झाले!)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -