घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसी गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे । म्हणौनि ते अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥
तसे जर सद्गुरूची कृपा होईल, तर प्रयत्न केला असता काय प्राप्त होणार नाही? म्हणून, ज्ञानदेव म्हणतात, अशी जी सद्गुरूकृपा, ती माझ्यावर पूर्ण आहे.
तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन । अतींद्रिय परि भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥
त्या योगाने मी बोलेन. माझ्या बोलण्यात निराकार वस्तू सर्वास दाखवीन आणि जी वस्तू इंद्रियातीत आहे, ती इंद्रियाकडून भोगवीन,
आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥
पहा यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा श्रेष्ठ गुण ज्या श्रीकृष्णाचे ठिकाणी वास करतात.
म्हणौनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होई आतां ॥
म्हणून त्याला भगवान असे म्हणतात; व ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, त्यांचा जो मित्र, तो पार्थास असे म्हणाला की, आता सावध हो.
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं । एर्‍हवीं विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥
श्रीकृष्ण म्हणतात :- पार्था, हे पहा योगी आणि संन्यासी हे या जगात एकच आहेत. ते वेगळे आहेत असे मानशील हो. कारण, या दोहोचा सहज विचार केला तर ते एकच आहेत.
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु । पाहातां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजीं ॥
त्यांच्यावर दोन नावाचा आरोप मात्र आहे, तो सोड. कारण, ब्रह्मदृष्टीने पाहू गेले असता या दोहोत फरक नाही, म्हणून योग तोच संन्यास होय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -