Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

घापे पटामाजि दृष्टी । दिसे तंतूंची सैंघ सृष्टी । परी एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ॥
वस्त्राकडे पाहिले असता जसे ते सर्व तंतूमय दिसते तसे त्याला ब्रह्मावाचून जगतात दुसरे काही दिसत नाही.
ऐसेनि प्रतीती हें गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुद्धी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥
अशा रीतीने सर्व जग भरलेले आहे असा ज्याला अनुभव येतो, तोच समबुद्धि होय, हे खोटे नाही, असे पक्के समज.
जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासही ॥
ज्याचे नाव तीर्थराज होय, ज्याचे दर्शन घेतले असता अंतःकरणाला समाधान होते आणि ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रमित झालेल्या पुरुषाची भ्रांती जाऊन तो ब्रह्मस्वरूप होतो,
जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धीतें विये । देखैं स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥
ज्याचे बोलणे हे धर्माचे जीवन आणि दृष्टी ही महासिद्धी उत्पन्न करणारी होय व स्वर्गादी सुखे हे ज्याचे खेळ आहेत,
विपायें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो तयातें प्रशंशितां । लाभु आथि ॥
अशा मनुष्याची जी चित्तात सहज आठवण झाली तरी तो आपली योग्यता देतो. फार काय सांगावे, त्याची स्तुती केली असता महान लाभच आहे.
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपणु असे । अखंडित ॥
जो कधीही मावळत नाही असा ज्ञानसूर्य ज्याचे हृदयात उदय पावला आहे, तो आपण आपल्या ठिकाणीच सदोदित ब्रह्मानंदात असतो.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -