घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार २६ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : शनिवार २६ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : राजकीय-सामाजिक कार्याला दिशा मिळेल. नवीन ओळख होईल. जीवनाला चांगली कलाटणी देता येईल. प्रयत्न करा.

वृषभ : जास्त अपेक्षा न ठेवता काम करा. यश मिळेल. घरातील वृद्धांसाठी वेळ काढावा लागेल. धंदा मिळेल.

- Advertisement -

मिथुन : प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. पदाधिकार मिळेल. नोकरीत बदल करता येईल.

कर्क : अडथळा दूर करण्यात यश मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीत कामाचा व्याप सहन करावा लागेल.

- Advertisement -

सिंह : तुमच्या कार्याचा प्रभाव सर्वत्र पडेल. जवळच्या लोकांना कमी समजू नका. संसारात प्रेमाने, विचाराने प्रश्न सोडवा.

कन्या : गुप्त कारवायांचा त्रास होईल. तुम्ही कोणताही अंदाज घेताना घाई करू नका. धंद्यात काम मिळवता येईल.

तूळ : ठरविलेले काम पूर्ण करता येईल. तुमच्या क्षेत्रात तुमचे नाव होईल. नवीन दिग्गज लोकांचा परिचय होईल.

वृश्चिक : ठरवाल ते करून दाखवता येईल. घर, वाहन, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. मनाप्रमाणे प्रगती होईल. आळस नको.

धनु : तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. नि:स्वार्थीपणाचे दर्शन होईल. अधिकार प्राप्ती मिळेल. मागे राहू नका.

मकर : आरोप येईल. दादागिरी करू नका. तुम्हाला कोणी गोत्यात आणत नाही याकडे लक्ष द्या. सावध रहा.

कुंभ : विचारांना चालना मिळेल. जुना वाद मिटवता येईल. व्यवसायात जम बसेल. प्रतिष्ठा वाढेल.

मीन : प्रवासात घाई करू नका. संयम ठेवा. जुने मित्र मदत मागण्यासाठी येतील. नावलौकिक मिळेल.

- Advertisment -