घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो श्रीकृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥
अशा प्रकारे अर्जुन हा धन्य, पुण्यपवित्र आणि भक्तिरूप बीज पेरण्याचे उत्तम शेत असल्यामुळेच श्रीकृष्णकृपेस पात्र झाला!
हो कां आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥
श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत जी नऊ प्रकारची भक्ती आहे, त्यापैकी आत्मनिवेदनाच्या अलीकडची जी सख्य नावाची आठवी भक्ती, त्या ठिकाणची अर्जुन ही मुख्य देवता आहे.
पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुनु तो सहजें । पढिये हरी ॥
मालक (भगवान) श्रेष्ठ शेजारी असता त्याचे वर्णन न करता सेवकाच्या गुणाचे वर्णन केले असता मालकाला आवडावे अशा योग्यतेचा अर्जुन हा भगवंताचा आवडता आहे.
पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहूनि काय न वानिजे । पतिव्रता?॥
जी प्रतिव्रता आपल्या पतीची प्रीतीने सेवा करिते आणि पतीस मान्य होते, त्या प्रतिव्रतेची पतीपेक्षा वाखाणणी करीत नाहीत काय!
तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे तो त्रिभुवनींचिया देवां । एकायतनु जाहला ॥
त्याचप्रमाणे, अर्जुनाचीच विशेष प्रशंसा करावी असे माझ्या मनास वाटले. कारण, तो त्रिभुवनाच्या सर्व भाग्याला एकटाच पात्र झाला आहे!
जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगें । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥
ज्याच्या आवडीच्या वेडाने निराकार अशा ब्रह्माला देखील अवतार घेणे भाग पडले आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण असूनही अर्जुनाच्या सख्याची त्याला उत्कंठा उत्पन्न झाली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -