घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥
त्या योगाला काय म्हणतात, त्याचा उपयोग कोणता आणि तो आचरण्यास अधिकारी कोण,
ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं । तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥
असे जे जे काही या संबंधाने योग्य असेल, ते सर्व आता तुला आम्ही सांगतो,
तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥
म्हणून तू लक्ष देऊन ऐक. असे बोलून श्रीहरींनी जे काही सांगितले, ती कथा पुढे (पुढील अध्यायात) आहे.
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥
निवृत्तिदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, द्वैत कायम ठेवून श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो योग सांगितला, तो आम्ही स्पष्ट करून सांगतो.
मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती आतां जो । योगरूप ॥
मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला,‘राजा, आता भगवान योगाबद्दल जो आपला अभिप्राय सांगतील तोच ऐक.
सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥
संजय ब्रह्मविद्येची व आपल्या भाग्याची थोरवी धृतराष्ट्राजवळ अडीच ओव्यात वर्णन करतो. नारायणांनी अर्जुनाला सहज ज्ञानरसाचे पारणे केले, तो तेच वेळी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो.
कैसी देवाची आगळिक नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करूनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥
दैवाची थोरवी काय वर्णावी! तहान लागलेल्या मनुष्याने पाणी पिण्याकरिता म्हणून पाण्याचे भांडे तोंडी लावावे व ते चाखून जो पाहतो तो ते अमृतच असावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -