घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जें आडमुठीं तत्त्व फावलें । तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें न पुसों तूतें ॥
त्याचप्रमाणे राजा, एखादी आडगिर्‍हाईकी मूल्यवान् वस्तू थोडक्यात मिळते, त्याप्रमाणे मला व तुला परमात्मतत्त्व प्राप्त झाले. परंतु धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की,‘तुला ब्रह्मरसाबद्दल मी काही विचारीत नाही!’
तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥
या बोलण्यावरून धृतराष्ट्र राजाचे मन पुत्राची हकीकत ऐकण्याविषयी उत्कंठित झाले आहे, असे संजयाने जाणले;
हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । एर्‍हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं इये ॥
हे जाणून तो मनात विस्मय पावला आणि म्हणाला, अरे अरे ! हा वृद्ध धृतराष्ट्र पुत्रवात्सल्याने अगदी वेडावला आहे. एर्‍हवी येथपर्यंतचा कृष्णार्जुनांचा संवाद अति उत्तम झाला;
परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधु कैसें पाहेल । तेवींचि ये रुसे घेईल । म्हणौनि बिहे ॥
परंतु या संवादाची गोडी याला कोठून कळणार? कारण जो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल! परंतु याला असे स्पष्ट बोलावे, तर राग येईल, म्हणून संजय भीतीने स्पष्ट बोलला नाही.
परि आपण चित्तीं आपुलां । निकियापरी संतोषला । जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥
परंतु श्रीकृष्णार्जुनांच्या परस्पर संवादापासून तो आपल्या मनात उत्तम प्रकारे संतोषित झाला.
तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंत:करणें । आतां आदरेंसी बोलणें । घडेल तया ॥
या आनंदाच्या तृप्तीने व प्रफुल्लित अंतःकरणाने तो आता मोठ्या अदबीने धृतराष्ट्राला अभिप्राय सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -