घरElection 2023'गहलोत खरोखरच जादूगार, सगळ्याच सुविधा गायब केल्या'; अमित शहा यांचा घणाघात

‘गहलोत खरोखरच जादूगार, सगळ्याच सुविधा गायब केल्या’; अमित शहा यांचा घणाघात

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी (7 नोव्हेंबर) राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजस्थान दौऱ्यावर आहेत.

जयपूर : सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रातील भाजप सरकार कॉंग्रेसची सत्ता असलेले राज्य त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. अशातच राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गहलोतांवर जोरदार हल्ला चढवला आहे.(Gahlot truly a magician, made all facilities disappear Amit Shahs war)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी (7 नोव्हेंबर) राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजस्थान दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी राज्यातील कुचामन जिल्ह्यात मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. पक्षाचे उमेदवार विजयसिंह चौधरी यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी ते येथे आले होते. राज्यात विधानसभेसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
यावेळी बोलताना काँग्रेस सरकारला ‘सर्वात भ्रष्ट सरकार’ असे वर्णन कर शहा म्हणाले की, अशोक गेहलोत यांना काँग्रेसमधील त्यांचे चाहते जादूगार म्हणतात. त्यांनी आपली जादू वापरून राजस्थानची वीज गायब केली. वसुंधरा राजे सरकारने विकसित केलेल्या आरोग्य सुविधाही गायब केल्या. रोजगार, कायदा आणि सुव्यवस्थाही नाहीशी झाली. हे फक्त जादूगारच करू शकतो असे म्हणत त्यांनी गहलोतांवर जोरदार हल्ला चढवला.

- Advertisement -

हेही वाचा : “या छोट्या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वावर…”, मध्य प्रदेश निवडणुकीबाबत शिवराज चौहानांचे मोठे वक्तव्य

लाल डायरीचा उल्लेख करून हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी कुचामन शहरात जाहीर सभेला संबोधित करताना राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लाल डायरीचा संदर्भ देत शहा म्हणाले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोणतीही लाल गोष्ट पाहिल्यानंतर संतापतात. अशोक गेहलोत यांच्या सरकारने आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राज्य उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. शहा म्हणाले की, अशोक गेहलोत यांचे सरकार पाच वर्षे चालले आणि अशोक गेहलोत यांच्या सरकारने ही शूरवीरांची भूमी नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सर्वात भ्रष्ट सरकार कुठेही असेल तर ते इथेच आहे. राजस्थान सरकार सर्वात भ्रष्ट आहे. कथित ‘रेड डायरी’ प्रकरणावर मुख्यमंत्री गेहलोत यांचा समाचार घेत शहा म्हणाले की, लाल रंग पाहिल्यानंतर गेहलोत यांना राग येतो. काहीही लाल असो, गेहलोत जी फक्त लाल डायरी पाहतात बाकी काही नाही असे म्हणत त्यांनी अशोक गहलोत यांना लाल डायरीचा संदर्भ देत इशारा दिला.

- Advertisement -

हेही वाचा : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचे खाण व्यवसायिकांसोबत कोट्यवधींचे व्यवहार; व्हिडीओ व्हायरलनंतर काँग्रेस आक्रमक

अयोध्येला येण्याचे दिले निमंत्रण

यावेळी बोलताना अमित शहा यांनी राजस्थानमधील नागरिकांपुढे राम मंदिराच्या स्थापनेबाबतची गोष्ट सांगितली. कॉंग्रेसवर 70 वर्ष अयोध्यामध्ये राम मंदिराचे निर्माण रोखण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 550 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून प्रभू श्रीराम अपमानित अवस्थेमध्ये होते. तर 70 वर्षांपासून कॉंग्रेस पक्ष राम मंदिराच्या निर्माणात आडकाठी आणत होती आणि लोकांना भटकवत होती. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही राम जन्मभूमीचे पुजन ककेले आणि आता 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठाही मोदींच्या हस्ते केली जाणार आहे, तेव्हा आतापासूनच अयोध्येचे तिकीट काढून ठेवा आणि या कार्यक्रमाला उपस्थित रहा असेही आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -