घरमनोरंजनSSR Death Case : सलमान खान, करण जोहरसह ८ सेलिब्रिटींना कोर्टात हजर...

SSR Death Case : सलमान खान, करण जोहरसह ८ सेलिब्रिटींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी आता मुजफ्फरपूरमध्येही कारायवाया सुरू झाल्या आहेत. मुजफ्फरपूर जिल्हा कोर्टाने आज, शुक्रवारी एक महत्त्वाचा आदेश जारी करत बॉलीवूडमधील तब्बत आठ कलाकारांना हजर होण्यास सांगितले आहे. या कलाकारांना वकिलांच्या मार्फत कोर्टात हजर होण्यास सांगितले आहे. पुढील महिन्यात ७ ऑक्टोबर रोजी त्यांना मुजफ्फरपूर कोर्टात हजर व्हावे लागणार आहे. या आठ कलाकारांमध्ये बॉलीवूडमधील बड्या लोकांच्या नावांचा समावेश आहे. त्यामध्ये सलमान खान, करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियालवाला, संजय लीला भंसाली, एकता कपूर, भूषण कुमार आणि दिनेश विजयन यांचा समावेश आहे. या सेलिब्रिटींच्या विरोधात अधिवक्ता सुधीर ओझा यांनी प्रतिवाद दाखल करत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसाठी यांना जबाबदार ठरवले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात अटकेत असून तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीतून भायखळा कारागृहात पाठवण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूड विश्वासह सुशांतच्या चाहत्यांचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून सुशांतला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर व्यक्त होत होते.

- Advertisement -

हेही वाचा –

जे.जे.रुग्णालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -