घरमहाराष्ट्रमुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्येच होणार!

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्येच होणार!

Subscribe

विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता; राज्यात पावणेदोन लाख परीक्षार्थी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे परीक्षांचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यात पदवी व पदव्युत्तर पदवीचे दोन लाख 84 हजार विद्यार्थी या ऑनलाईन परीक्षेस प्रविष्ठ होतील. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होणार नाही, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे.

मुक्त विद्यापीठाशी संलग्न पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा होणार की नाही, याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या परीक्षा घेण्याचे निर्देश देत सप्टेंबरमध्येच परीक्षा घेण्याची सूचना केली होती. मात्र, मुक्त विद्यापीठाने परीक्षांचे नियोजन करुन 6 ते 20 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित केलेला होता. ‘यूजीसी’ने निश्चित केलेल्या वेळेत मुक्त विद्यापीठाला परीक्षा घेणे शक्य नसून ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले होते. अर्थात, सर्वच विद्यापीठांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मुदतवाढ देण्याचे मागणी यूजीसीकडे केली होती. त्याला परवानगी मिळाल्याने अखेर मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

अशा होतील परीक्षा

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विषयानुरुप साधारणत: 60 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (एमसीक्यू) सोडवण्यासाठी एक तासांचा कालावधी असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर डेमोदेखील बघायला मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना अपरिहार्य कारणास्तव परीक्षा देणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची व्यवस्था मुक्त विद्यापीठाने केली आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.

E. vayunandan

ऑक्टोबरमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच परवानगी दिली. त्याविषयीचे अधिकृत पत्र शुक्रवारी विद्यापीठाला प्राप्त झाले. त्यामुळे परीक्षांचा मार्ग मोकळा झाला असून, निकाल 30 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होतील.
                                                                                  – ई. वायुनंदन, कुलगुरु, मुक्त विद्यापीठ, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -