घरमनोरंजनमुल झाल्यानंतरही काम करणे चुकीचे नाही - राणी मुखर्जी

मुल झाल्यानंतरही काम करणे चुकीचे नाही – राणी मुखर्जी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या एका मुलीची आई आहे. मुल झाल्यानंतर तिने काहीवेळ चित्रपटांपासून विराम घेतला होता. मात्र कामावर पून्हा रुजू होण्यामध्ये काही चुकीचे नसल्याचे तिने सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही नेहेमी आपल्या स्त्रीवादी भूमिकांसाठी चर्चेत असते. आपल्या चित्रपटातून राणीने अनेकदा महिलांच्या समस्या मांडल्या आहेत. राणी मुखर्जी ही आपल्या अभिनयासाठी चर्चेत असते. मागील काही महिन्यांपासून राणी कोणत्याही चित्रपटात झळकली नव्हती. त्यामुळे राणीने चित्रपटातून सन्यास घेतला की काय? असा प्रश्न फॅन्सद्वारे करण्यात आला होता. मात्र राणी पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबँक करणार असल्याचे तिने पिंक व्हिला वेबपोर्टलला ही माहिती दिली. राणी मुखर्जीला मुलगी झाल्यापासून चित्रपटामध्ये काम कमी केले आहे. २०१५ मध्ये राणी मुखर्जीला मुलगी झाली होती. मार्च २०१८ मध्ये तिने हिचकी चित्रपटात काम केले. मर्दानी या चित्रपटातून तिने महिलांच्या समस्या मांडल्या.

काय म्हणाली राणी 

“गरोदर असताना आणि मुल झाल्यावर मुलाला संभाळण्यासाठी तुम्हाला काही काळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. आपण आई झालोत तरीही कामावर पून्हा जाण्यास आपलल्याला लाज वाटू नये. पुरुषांनीही असाच विचार करावा. आपले पालक आपल्याला वाढवण्यासाठी कठिण प्रयत्न करत असल्याचे तिच्या लक्षात आणून द्या. यामुळे पालकांसाठी तिचा आदर वाढेल.” – राणी मुखर्जी अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -