घरदेश-विदेशएअर स्ट्राईकमुळे जैशचे तळ उध्वस्त; अझरच्या भावाची कबुली

एअर स्ट्राईकमुळे जैशचे तळ उध्वस्त; अझरच्या भावाची कबुली

Subscribe

मौलाना अम्मार याने जारी केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात बालाकोटमधील आमचे तळ उध्वस्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ऐ-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. मात्र पाकिस्तान सरकार आणि लष्कराने आमचे काहीच नुकसान झाले नसल्याचा दावा केला होता. मात्र आता जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेनेने भारताच्या हवाई हल्ल्यात आमचे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा छोटा भाऊ मौलाना अम्मार याने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बालाकोटमधील तळ उध्वस्त 

मौलाना अम्मार याने जारी केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात बालाकोटमधील आमचे तळ उध्वस्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच ‘मर्काज’ या धार्मिक शिक्षा केंद्रावर बॉम्ब फेकल्याचे त्याने सांगितले असून याबाबत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान त्याने, शत्रूंशी युध्द पुकारले असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेशावरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मौलाना अम्मारनं ही कबुली दिली. ‘भारतीय लढाऊ विमानांनी कोणत्याही एजन्सीच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं नाही. त्यांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्बहल्ला केलेला नाही. काश्मीरमधील मुस्लिमांच्या मदतीसाठी त्यांनी आमच्या केंद्रांवर हल्ला चढवला आहे,’ असंही अम्मार म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -