घरमनोरंजन'आई माझी काळूबाई' मध्ये बदल; प्राजक्ता गायकवाडच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

‘आई माझी काळूबाई’ मध्ये बदल; प्राजक्ता गायकवाडच्या जागी दिसणार ‘ही’ अभिनेत्री

Subscribe

कोणतीही पूर्वसूचना न देता प्राजक्ताने एका दिवसात मालिका सोडली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मालिका आणि चित्रपटांचे शुटिंग बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा मालिकांचे शुटिंग सुरू झाले. कोरोना दरम्यान नव्याने सुरू झालेली मराठी मालिका ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेला कोरोनाकाळात अनेक अडचणींचा समना करावा लागला. दरम्यान या सेटवरील अनेकांना कोरोनाची लागण देखील झाली. मात्र आता या मालिकेत आणखी एक मोठा बदल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या मालिकेत आर्याची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाडने अचानक मालिका सोडल्याने प्राजक्ता गायकवाडची जागा आता ‘बिग बॉस २’ फेम अभिनेत्री वीणा जगताप ही घेणार आहे.

संभाजीराजेंच्या मालिकेत झळकलेली प्राजक्ता ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतल्या आर्या या मुख्य भूमिकेसाठी प्राजक्ताची निवड झाली. मात्र तीन महिन्यांनंतर प्राजक्ताच्या वर्तवणूकीचा फटका मालिकेच्या टीमला बसू लागल्याचे सांगितले जात आहे. मालिकेच्या टीममध्ये आणि प्राजक्ता यांच्यात वारंवार होणाऱ्या वादामुळे तिने मालिका सोडली असेही सांगितले जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता प्राजक्ताने एका दिवसात मालिका सोडली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताच्या वागणुकीमुळे सोनी मराठी चॅनलचे पदाधिकारी आणि निर्माते नाराज आहेतच. पण त्यातूनही त्यांनी शो मस्ट गो ऑन चा नारा देत आर्या भूमिकेसाठी वीणा जगतापला राजी केले असून वीणाही ताातडीने साताऱ्याला आली असून चित्रीकरणाला विणाने सुरुवातही केली आहे. दरम्यान, प्राजक्ताने या मालिकेतून माघार घेतल्याने सोनी मराठीने तातडीने वीणा जगताप या अभिनेत्रीचे नाव निर्मात्यांना सुचवले आणि विणानेही या पात्रासाठी होकार दिल्याने प्रेक्षकांना या मालिकेत आर्याच्या भूमिकेत विणा जगताप दिसणार आहे.


Happy Birthday SRK: ‘या’ फेमस डायलॉग्समुळे शाहरुख ठरला बॉलिवूडचा बादशाह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -