घरताज्या घडामोडीHijab Row : हिजाब प्रकरणात अटक झालेल्या अभिनेता चेतन कुमारला जामीन

Hijab Row : हिजाब प्रकरणात अटक झालेल्या अभिनेता चेतन कुमारला जामीन

Subscribe

विकेंडला कोर्ट बंद असल्याने चेतन सोमवारी घरी परतणार आहे. सोमवार पर्यंतच त्याला न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे.

Hijab Row :  हिजाब प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तींविरोधात ट्विट केल्याने अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेता चेतन कुमारची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. चेतनची पत्नी मेघा हिने ही माहिती दिली आहे. शनिवारी रविवारी कोर्ट बंद असल्याने सोमवारी चेतनची सुटका करण्यात येणार आहे.

चेतनच्या पत्नीने फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, चेतनला २३फेब्रुवारीला जामीनावर सुनावणी पार पडली. त्यानंतर २५ फेब्रुवारीला जामीनाचा आदेश राखून ठेवण्यात आला होता. २५ फेब्रुवारीला संध्याकाळी चेतनला जामीन मिळाला आहे. मात्र औपचारिकतेमुळे अद्याप जामीन रिलीज करण्याची ऑर्डर जारी करण्यात आलेली नाही. विकेंडला कोर्ट बंद असल्याने चेतन सोमवारी घरी परतणार आहे. सोमवार पर्यंतच त्याला न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे.

- Advertisement -

चेतनच्या पत्नीने पुढे असे म्हटले आहे की, एखाद्याला त्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणे फार वाईट आहे. आम्हाला आशा आहे की चेतनच्या सुटकेला आणखी विलंब होणार नाही. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.

चेतन कुमारने १६ फेब्रुवारीला न्यायाधीश कृष्णा दीक्षित यांचे जुने ट्विट रिट्विट केले होते. जुन्या ट्विटमध्ये न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास आणि बलात्कार पीडितेवर टिप्पणी केली होती. हे ट्विट रिट्विट करत चेतन कुमारने हिजाब वादावरुन न्यायमूर्तीवर आक्षेपहार्य ट्विट केले होते. त्यानंतर आयपीसी कलम ५०५ (२) आणि ५०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा –  कंगनाचा Lock Up अडचणीत, निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -