घरमनोरंजन'सीते'ने केला धक्कादायक खुलासा; म्हणाल्या, 'यामुळे झाली घोर निराशा'!

‘सीते’ने केला धक्कादायक खुलासा; म्हणाल्या, ‘यामुळे झाली घोर निराशा’!

Subscribe

सध्या छोट्या पडद्यावर रामायण आणि महाभारतासारख्या जुन्या, पौराणिक मालिका पुन्हा दाखवल्या जात आहेत. या काळातही या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रामायणाने टीआरपीचे उच्चांक काठले असून त्यासंबंधीच्या विविध बातम्या आणि माहितीदेखील समोर येऊ लागली आहे. त्यातच रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिता चिखालिया हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मालिकेसाठी मिळणाऱ्या मानधनाबाबत त्यांनी खुलासा केला असून व्यक्तिरेखेला न्याय देणारे मानधन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – भारताच्या गेमचेंजर औषधाने केलं निराश; जगाला होती आशा

- Advertisement -

न योग्य मानधन न पुरस्कार, सन्मान 

सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखालिया यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही खंत व्यक्त केली आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रामायण मालिकेसाठी निर्माता रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांना पत्र लिहून धन्यवाद दिले आहे. नव्या पिढीसाठी रामायण वरदान असल्याचे मत त्यांनी मांडले. यासंबंधी दीपिकाने प्रतिक्रिया देताना हा खुलासा केला आहे. रामायण मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मात्र सरकारने अपेक्षित असे कौतुक केले नाही. न कोणाला नॅशनल अवॉर्ड मिळाले न पद्म पुरस्कार. त्या काळी रामायणमध्ये काम करणाऱ्यांचे मानधन देखील इतके कमी होते की, आता ते उघडपणे सांगूही शकणार नाही. आताच्या काळातही रामायणाला इतकी पसंती मिळत आहे. कारण यातील सर्व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी यात दाखवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -