घरCORONA UPDATEरियाझ नैकूच्या मृत्यूनंतर 'बुरहानवानी गॅंग'चा अंत

रियाझ नैकूच्या मृत्यूनंतर ‘बुरहानवानी गॅंग’चा अंत

Subscribe

६ मे रोजी सुरक्षा बलाने कुख्यात आतंकवादी रियाझ नैकूला मारले. त्यामुळे हिजबुल मुजाहिद्दीन आणि पाकिस्तान यांना मोठा झटका बसला.

जम्मू-काश्मीर घाटीमध्ये अशांती पसरविण्यात पाकिस्तान अनेक करामती करत असतात, परंतु भारतीय सुरक्षा बल यांच्या करामती उद्धवस्त करते. ६ मे रोजी सुरक्षा बलाने कुख्यात आतंकवादी रियाझ नैकूला मारले. त्यामुळे हिजबुल मुजाहिद्दीन आणि पाकिस्तान यांना मोठा झटका बसला. कारण बुरहानवानी नंतर नैकू हा दहशतवादी दुनियेत चांगले नाव कमवत होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पोस्टर बॉय बुरहानवानीला भारतीय सैन्याने ठार केल्यावर हिजबुल मुजाहिद्दीनने रियाझ नैकू कमांडर झाला होता. A ++ श्रेणीच्या  दहशतवादी या मोस्ट वॉन्टेड असलेला नैकूवर १२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

२०१६ साली भारतीय लष्कराने बुरहान वानी चा एन्काऊंटर केला होता. हा पाकिस्तानासाठी मोठा झटका होता. घाटीमध्ये वानीच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीने सरकारला चिंतेत टाकले होते. मात्र, लष्कराने स्थितीवर नियंत्रण आणले. रियाझ नैकू आठ वर्षांपासून फरार होता. त्याला काश्मीरी दहशतवादी बुरहान वानी समूहात महत्त्वाचे स्थान होते. या दहशतवादी गँगमध्ये बुरहान वानीसह सबजार भट, वसीम मल्ला, नासीर पंडित, इश्फाक हमीद, तारिक पंडित, अफाकुल्लाह, आदिल खांडे, सद्दाम पद्दार, वसीम शाह आणि अनिस यांचा समावेश होता.

- Advertisement -

बुरहान वानी

८ जुलै २०१६ मध्ये दक्षिण काश्मीरच्या अनंत नाग जिल्ह्यातील कोकेरनाग परिसरात भारतीय लष्कराने बुरहानवानीला यमसदनी पाठविले. लष्कराला कोकेरनाग के बिंदुरा गावात तीन उच्च प्रशिक्षित दशतवादी असल्याची माहिती मिळावी होती. यावेळी स्थानिक पोलीस आणि लष्कराने मोर्चा सांभाळला. सर्वात पहिले गावाच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांना बंद करण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी गावात घुसून बुरहानवानीला मारले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -