घरमनोरंजनमानसी नाईक चाहत्यांना देणार 'गुडन्यूज'?

मानसी नाईक चाहत्यांना देणार ‘गुडन्यूज’?

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि स्टायलिस्ट अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. मानसी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मानसीने मराठी चित्रपटांमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली. सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी मानसी चाहत्यांना नेहमी घायाळ करत असते. तिचा अभिनयाचे देखील विशेष कौतुक केले जाते. सोशल मीडियावरही मानसी सतत आपले नवनवे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. मात्र सध्या ती चित्रपट किंवा गाण्यामुळे चर्चेत नसून नव्या फोटोंमुे चर्चेचा विषय ठरली आहे. मानसीने एक इंटरेस्टिंग फोटो शेअर केला आहे. या फोटोत मानसी चक्क बेबी बंप दाखवताना दिसली दिसतेय.

मराठीतील आयटम साँग्स आणि चित्रपटांमुळे चर्चेत असणाऱ्या मानसी नाईकचे हे नवे फोटो पाहून चाहते देखील संभ्रमात पडले आहेत. या फोटोमध्ये मानसीने एक साधी-संपल साडी परिधान केली आहे.तिच्या एका हातात चॉकलेट आहे. तर दुसऱ्या हाताने ती बेबी बम्प दाखवताना दिसतेय. हे फोटो शेअर करत मानसीने ‘लवकरचं’ असं कॅप्शन दिले आहे. मात्र हा फोटो पाहून चाहते अवाक् झाले आहेत. यावरून काहींनी मानसीला ट्रोल केलं आहे.  तर काही चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. काल-परवापर्यंत फिटनेस फ्रिक बॉडी दाखवणाऱ्या मानसीने अचानक बेबी बंप दाखवतानाचा फोटो पाहून नव्या चर्चांना उधान आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

- Advertisement -

मात्र यावरून मानसी नाईक रियलमध्ये प्रेग्नेंन्ट नसून हा तिच्या आगामी प्रोजेक्ट्मधील लूक असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मानसीने यावर्षी जानेवारी महिन्यात बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली. या दोघांची जोडी सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध आहे. मानसी आणि प्रदीप अनेकदा एकमेकांसोबतच्या व्हिडिओ शेअर करत असतात. हे दोघेही बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. मैत्री आणि त्यानंतर प्रेम प्रवास पूर्ण करत मानसीने प्रदीपसह लग्न केले. मानसी ही महाराष्ट्रीयन आहे तर प्रदीप मूळचा हरियाणाचा आहे. त्यामुळे या दोघांकडून २ भिन्न संस्कृतींच दर्शन घडताना दिसते.

- Advertisement -

मानसी आपल्या पतीसोबतचे रोमँटिक फोटोही शेअर एकमेकांवर सतत प्रेम व्यक्त करताना दिसून येतात. त्यांचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांनाही चांगलाच भावतो. अभिनेत्री मानसी नाईक मराठीतील एक बोल्ड आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली निर्माण करणाऱ्या मानसीला ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -