घरताज्या घडामोडीMhada Lottery 2021 : म्हाडा लॉटरीच्या स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची तारीख घोषित

Mhada Lottery 2021 : म्हाडा लॉटरीच्या स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची तारीख घोषित

Subscribe

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक पुन्हा जाहीर करण्यात आले असून या नवीन वेळापत्रकात स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे-हरकती दाखल करणे, सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी याबाबतच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी https://lottery.mhada.gov.in व  https://mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ६ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे. प्रारुप यादीची प्रसिद्धी झाल्यापासून दावे-हरकती ७ ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.inhttps://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर ८ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी दिली.
संगणकीय सोडतीचा कार्यक्रम यापूर्वी निश्चित झाल्याप्रमाणे दि. १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Mhada Lottery 2021 : 10 लाखांमध्ये मुंबईनजीक घर, म्हाडाची कुठे किती घरे ?


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -