घरक्रीडाAUS VS PAK : तब्बल २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा; 'PCB' कडून...

AUS VS PAK : तब्बल २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा; ‘PCB’ कडून वेळापत्रक जाहीर

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ १९९८ नंतर प्रथमच तब्बल २४ वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान सोबत मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ १९९८ नंतर प्रथमच तब्बल २४ वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान सोबत मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यात एकूण सात सामने होणार आहेत. दोन देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीसाठी टक्कर होण्याची चर्चा असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याबद्दल माहिती जाहीर केली. पाकिस्तानच्या धरतीवर या दौऱ्यात ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि १ टी-२० सामन्याचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया १९९८-९९ मध्ये झालेल्या मालिकेनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा करणार आहे.

पाकिस्तानमध्ये १९९८ मध्ये पेशावर मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने नाबाद ३३४ धावांची खेळी करून ही मालिका अविस्मरणीय केली होती. १९९८ मध्ये झालेल्या शेवटच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत १-० तर एकदिवसीय मालिकेत ३-० अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला होता.

- Advertisement -

रावळपिंडी मैदानाबाहेर संभाव्य हल्ल्याचा इशारा लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघानी यावर्षी होणारा पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा दौरा करणार यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्यांच्या दौऱ्याची जबाबदारी घेऊन त्यांच्या दौऱ्यातील योजनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

२००९ मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी प्रतिस्पर्धी संघाना मालिका खेळण्यास बंदी घातली होती. त्यानंतर ६ वर्षानंतर २०१५ मध्ये झिम्बावेचा संघ पाकिस्तानला गेला असता पाकिस्तानच्या संघाकडून यजमानांचे स्वागत करण्यात आले होते. लाहोरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या आठ वर्षांनंतर श्रीलंकेने २०१९ मध्ये पूर्ण मालिकेसाठी खेळण्यापूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्ये पाकिस्तानमध्ये एक सामना खेळला.


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -