घरताज्या घडामोडीयुवराजनंतर 'ही' बॉलिवूड अभिनेत्री हरियाणा पोलिसांच्या ताब्यात

युवराजनंतर ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री हरियाणा पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

जवळपास ३ तास हरियाणा पोलीस युविकाची चौकशी करत होते

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगला (Yuvraj singh)  अनुसूचित जातीबाबत सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्य टिप्पणी वरुन हरियाणाच्या हांसी पोलिसांनी अटक केली होती आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. आता युवराज सिंग नंतर बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरी (Yuvika Chaudhary)  हिला देखील अनुसूचित जातीबाबत टिप्पणी आणि अपमानास्पद वक्तव्याबाबत प्रकरणी हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३ तास हरियाणा पोलीस युविकाची चौकशी करत होते. त्यानंतर औपचारिक जामिनावर तिला सोडण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हायकोर्टाच्या आदेशानुसार, युविका चौधरीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. चौकशी वेळी युविका सोबत पती प्रिंस नरुला तिचे वकील आणि इतर काही लोक उपस्थित होते. युविकाने याच वर्षी मे महिन्यात तिच्या ब्लॉग वरुन अनुसूचित जातीविषयी टिप्पणी केली होती. सामाजिक कार्यकर्त्या रजत कलसन यांनी अभिनेत्री युविका चौधरी हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच काल क्रिकेटर युवराज सिंग याच्या विरोधात ही सामाजिक कार्यकर्त्या रजत कलसन यांनीच तक्रार दाखल केली होती.

कलसन यांनी म्हटले आहे की, प्रसिद्ध हिंदी मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच बबीता जी हिच्या विरोधात देखील हांसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र तिच्या अटकेची नोटीस अद्याप जारी करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

क्रिकेटर युवराज सिंगने मागील वर्षी क्रिकेटर रोहित शर्मासोबत इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. त्यात त्याने भारताचा प्रसिद्ध गोलंदाज यजुवेंद्र चहलसाठी एक आक्षेपार्य शब्द वापरला होता. त्यानंतर युवराज सिंग विरोधात एससी/एसटी कायद्यातंर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती.


हेही वाचा – तब्बल १०० लिटर ब्रेस्ट मिल्क डोनेट करत, निधी परमार बनली भुकेलेल्या जीवांची आई

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -