घरमनोरंजनतब्बल १०० लिटर ब्रेस्ट मिल्क डोनेट करत, निधी परमार बनली भुकेलेल्या जीवांची...

तब्बल १०० लिटर ब्रेस्ट मिल्क डोनेट करत, निधी परमार बनली भुकेलेल्या जीवांची आई

Subscribe

प्रत्येकाच्या जीवनात आई-वडील होणं या शिवाय मोठा आनंद कोणताही नाही. मात्र मातृत्त्वाची संकल्पना एक बॉलिवूड निर्मातीने पूर्ण बदलून टाल्य़ाचे पाहायला मिळतेय. पोटच्या पोरापेक्षा समाजातील अनाथ बाळांचा विचार करुन ही बॉलिवूड निर्माती भुकेलेल्या तान्ह्यां जीवांची आई बनली आहे. ती या लहान कोवळ्या जीवांच्या आईच्या दुधाची भूक भागवण्याचा प्रयत्न करतेय. निधी परमार हिरानंदानी असं या बॉलिवूड निर्मातीचे नाव आहे.

बॉलिवूडमध्ये एक उत्कृष्ट निर्मात्या म्हणून निधी परमार यांची ओळख आहे. ‘सांड की आँख’ या वेगळ्या थाटणीच्या चित्रपट निर्मितीमुळे त्यांनी यशाचा नवा टप्पा पार केला. चित्रपट निर्मिती क्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे त्यांनी संघर्ष केला. याच संघर्षादरम्यान त्यांना आयुष्याचा खरां जोडीदार भेटला.लग्नानंतर वैयक्तिक आयुष्यात त्यांना इतर स्त्रीयांप्रमाणेच संघर्ष करावा लागला. लग्न झालं आता मूलं कधी अशी विचारणा होऊ लागली. मात्र या दडपणाखाली  न येता निधी यांनी स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु करण्याचे स्वप्न सर्वप्रथम पूर्ण केले.

- Advertisement -

यात प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्यांनी ‘सांड की आँख’ सिनेमा निर्मित केला. त्यांनंतर त्यांनी आई होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या ४० व्य़ा वर्षी त्या आई झाल्या. मात्र वैयक्तिक जीवन आणि करियर अशा दोघांची यशस्वी सांगड घालत त्यांनी असं काही काम करु दाखवले की ऐकूण तुम्हालाही हेवा वाटेल. स्त्री म्हणून आपल्या सर्जनशीलतेचा, ममतेचा नवा पैलू त्यांनी घडवून दाखवला. निधी यांनी स्तनपान आणि मानवी दूध दान देण्याविषयीची रुढी नव्या पद्धतीने समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊदरम्यान लवकर जन्मलेल्या बाळांसाठी तिने आपले १०० लीटर दूध दान केले आहे.

आपल्या बाळाला दूध पाजून झाल्यानंतर बरेच दूध शिल्लक राहिल्याचे लक्षात आल्यानंतर ते दूध अनाथ मुलांना ज्यांना आईचे दूध मिळत नाही आणि ज्यांना गरज आहे त्यांना दान करायचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबियांचा प्रथम विरोध होता मात्र विरोध झुगारुन त्यांनी हे करण्याचा निर्णय़ घेतला. आत्तापर्यंत त्यांनी १०० लीटर दूध दान करून अनेक निष्पाप जीवांचे जीव वाचवले आहेत. यातून निधी परमार य़ांनी आपल्या कार्यातून एखादी सामान्य स्त्री ठरवलं तर काही करु शकते हे दाखवून दिले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -