घरताज्या घडामोडीअजय देवगणचं OTTवर पदार्पण, Rudra The Edge of Darknessचा ट्रेलर रिलीज

अजय देवगणचं OTTवर पदार्पण, Rudra The Edge of Darknessचा ट्रेलर रिलीज

Subscribe

रुद्र या वेब सिरीजमध्ये अभिनेता अजय देवगण सोबत अभिनेत्री राशी, ईशा त्याचप्रमाणे मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर देखील प्रमख भूमिकेत असणार आहेत. तसेच आशिष विद्यार्थी, सत्यदीप मिश्रा, तरुण गहलोत देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan)  ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Web Series)  पदार्पण करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. अखेर अजयच्या रुद्रा (Rudra)  या वेब सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर अजय देवगण प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अजय देवगणची ही वेब सिरीज ब्रिटीश सायकोलॉजिकल क्राइम ड्रामा सिरीज ‘लूथर’चे रुपांतर आहे. अजय देवगण यात एका पोलीस अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका साकारत आहे. एक पोलीस अधिकारी कसा सायको क्रिमिनल बनतो हे दाखवण्यात आले आहे. सिरीजची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही मात्र प्रेक्षक सिरीज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सिरीज रिलीज होणार आहे.

अभिनेता अजय देवगणने त्याच्या पहिल्या ओटटी डेब्यूचा ट्रेलर शेअर करत ‘रोशनी और अंधेरे के बीच की लकीर… जहा मैं रहता हूँ #Rudra Coming Soon’ असे कॅप्शन दिले आहे. अजयने त्याच्या ओटीटी पदार्पणाने त्याच्या चाहत्यांना खूश केले आहे. अजयने म्हटलेय की, डिजिटल स्ट्रीमिंगने मला नेहमीच आकर्षित केले आहे. रुद्रा अशा शानदार टाइटलच्या लाँग फॉर्मेट कंटेटसोबत मी डिजिटल एक्टिंग डेब्यू करण्यासाठी फार उत्साही आहे. या भूमिकेतील बारकाई मला सर्वांत जास्त भावली. बहुमुखी व्यक्तिमत्त्व आणि त्याचे धैर्य प्रेक्षकांनी याआधी कधीच पाहिले नसेल.

- Advertisement -

अजय देवगणने रुद्र मधील भूमिका का स्वीकारली असे त्याला विचारले असता त्याने म्हटले, ‘सर्वांपेक्षा काहीतरी वेगळे आणि हटके करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. त्याचप्रमामे नवीन पॅशनेट लोकांसोबत काम करण्याचा देखील माझा प्रयत्न असतो. कारण याने भारतातील मनोरंजनाची प्राप्ती आणि व्याप्ती वाढत आहे. मला ही डिजिटल दुनिया फार आकर्षित करते’.

- Advertisement -

रुद्र या वेब सिरीजमध्ये अभिनेता अजय देवगण सोबत अभिनेत्री राशी, ईशा त्याचप्रमाणे मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर देखील प्रमख भूमिकेत असणार आहेत. तसेच आशिष विद्यार्थी, सत्यदीप मिश्रा, तरुण गहलोत देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही सिरीज डिज्नी प्लस हॉटस्टारवर हिंदी तसेच तमिळ, तेलुगू, कन्नड मल्याळम आणि बंगाली भाषेत रिलीज होणार आहे.


हेही वाचा – Madhuri Dixitचं OTT वर पदार्पण! ‘या’ वेब सिरीजमध्ये करणार काम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -