घरमनोरंजनअक्षय कुमारचा सिनेमा 'पृथ्वीराज'वादाच्या भोवर्‍यात,करणी सेनेने दर्शवला विरोध!

अक्षय कुमारचा सिनेमा ‘पृथ्वीराज’वादाच्या भोवर्‍यात,करणी सेनेने दर्शवला विरोध!

Subscribe

अक्षय कुमार सध्या सतत चित्रपटांच्या नावारून वादात फसत जात आहे. गेल्या वेळेस 'लक्ष्मी' या चित्रपटाचे नाव सुद्धा त्याला बदलावे लागले होते.

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारला सध्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अक्षयचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ सतत वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवन आणि शौर्यावर आधारित असणार आहे. पण चित्रपटाच्या नावावर करणी सेना यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांची मागणी आहे की सिनेमाचे नाव बदलण्यात यावे.करणी सेना पक्षातील युवा शाखेचे अध्यक्ष सुरजीत सिंग यांच्या म्हणन्या नुसार ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट महान राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असणार आहे तर सिनेमाच्या टिमने सिनेमाचे नाव फक्त ‘पृथ्वीराज’ कसे ठेवू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे चित्रपटाचे नाव बदलून आदरासह पूर्ण नाव ठेवण्यात यावं. तसेच चित्रपट रिलीज होण्याआधी त्यांना दाखवण्यात यावा. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर याचे परिणाम सहन करण्यास तयार रहा. संजय लीला भन्साली यांचा सिनेमा पद्मावत वेळेस मेकर्स सोबत जे काही झालं तश्याच प्रकारे तुम्ही सुद्धा परिणाम भोगण्यास तयार राहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prithviraj (@prithvirajmovie)

- Advertisement -

अक्षय कुमार सध्या सतत चित्रपटांच्यानावावरून वादात फसत आहे. गेल्या वेळेस ‘लक्ष्मी’ या चित्रपटाचे नाव सुद्धा त्याला बदलावे लागले होते. याआधी सिनेमाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे होते मात्र लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे अनेकांनी या नावाचा विरोध केला होता यानंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले होते

यशरज बॅनर अंतर्गत तयार होत असणार्‍या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाची शूटिंग यावर्षी फेब्रुवारीत पूर्ण झाली आहे. लॉकडाउन मुळे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनेक अडचणी उभ्या रहील्या होत्या. अक्षय कुमार व्यतिरिक्त सिनेमात मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद,आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. चित्रपट लवकरच रिलीज होणार असल्याचे बोलण्यात येत आहे

- Advertisement -

हे हि वाचा – अभिनेता भूषण कडूवर कोसळला दु:खाचा डोंगर,कोरोनामुळं झाले पत्नीचं निधन !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -