प्रश्न हा कम्फर्ट झोनचा आहे, हिंदी चित्रपटात काम करण्यावरून अल्लू अर्जुनचं मत चर्चेत

हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासंदर्भात विचारल्यावर अभिनेता अल्लू अर्जुनने त्यावर प्रतिक्रिया दिली. अल्लू अर्जुनची हीच प्रतिक्रीया सध्या चर्चेत आली आहे.

allu arjun

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन(south indian actor allu arjun) याचा पुष्पा(pushpa) हा चित्रपट सुपर हिट ठरला. बॉक्स ऑफीसवर सुद्धा या चित्रपटाने चांगलीच बाजी मारली. हा चित्रपट केवळ दाक्षिणात्य प्रेक्षकांपर्यंत मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण देशालाच या चित्रपटाची भुरळ पडली. या चित्रपटाची गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली, तर या चित्रपटातील संवाद सुद्धा प्रेक्षकांच्या ठळक लक्षात आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुनाचा देशी लूकसुद्धा अनेकांना आवडला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सुद्धा प्रेक्षकांनी तेवढीच पसंती दिली. अशातच आता हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासंदर्भात विचारल्यावर अभिनेता अल्लू अर्जुनने त्यावर प्रतिक्रिया दिली. अल्लू अर्जुनची हीच प्रतिक्रीया सध्या चर्चेत आली आहे.

हे ही वाचा – सुष्मिता सेन आधीपासूनच एक श्रीमंत स्त्री; उर्फी जावेदकडून पाठराखण

सध्या दाक्षिणात्य चित्रपट हे सगळ्याच बाबतीत वरचढ असलेले पाहायला मिळत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांनाही केवळ प्रादेशिकच नाही तर इतर भाषिक प्रेक्षक वर्ग सुद्धा मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटाला दिवसागणिक यश मिळतं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी विरुद्ध बॉलिवूड असा वादंग रंगलेला सुद्धा पहिला. अशातच हिंदी चित्रपट सृष्ष्टीमधे काम करण्यावरून दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू नंतर अल्लू अर्जुनने(allu arjun) सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. अल्लू अर्जुनाची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

हे ही वाचा – गझलकार आणि गायक भूपिंदर सिंह यांचे निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

हे ही वाचा – ‘मी पुन्हा येईन’मध्ये दिसणार सत्तेचा घोडेबाजार

allu arjun : pushpa

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन(allu arjun) याला नुकतीच एका मुलाखती दरम्यान विचारले की ‘जर कधी संधी मिळाली तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम करशील का?’ याच प्रश्नाचं उत्तर देताना अल्लू अर्जुन म्हणाला, की ”हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मी उत्सुक तर आहेच मात्र हिंदी मध्ये अभिनय करणं हे माझ्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करण्यासारखं आहे. पण जर का याची गरज पडली तर त्या साठी पूर्ण मेहनत घ्यायला
सुद्धा तयार आहे.” अल्लू अर्जुनने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. दरम्यान जर बॉलिवूड मध्ये काम करायचंच झालं तर अल्लू अर्जुनचं मुंबईत देखील घर आहे. अल्लू अर्जुन हा दक्षिणेकडील एक उत्तम अभिनेता(saouth indian actor allu arjun) आहे. अभिनय, डान्स, लूक, स्टाईल या सगळ्याच बाबतीत लल्लू अर्जुन उत्तम आहे. अल्लू अर्जुनाचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे.

हे ही वाचा –  निक जोनसपूर्वी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं प्रियांका चोप्राचं नाव