सुष्मिता सेन आधीपासूनच एक श्रीमंत स्त्री; उर्फी जावेदकडून पाठराखण

सुष्मिता सेनच्या या पोस्टवर अनेक बॉलिवू़ड कलाकार कमेंट्स करत सुष्मिता सेनला पाठिंबा दिला. आता या यादीत बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आणि मॉडल उर्फी जावेद हीने सुद्धा सुष्मिता सेनला पाठिंबा दिला आहे

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. मात्र, आता हळूहळ त्यांच्या नाच्याबद्दल बॉलिवूडमध्ये देखील चर्चा होत आहे. सुष्मिता आणि ललितच्या नात्यावर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतीच सुष्मिता सेन स्वताःच्या एका फोटोची नवीन पोस्ट आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. सुष्मिता सेनच्या या पोस्टवर अनेक बॉलिवू़ड कलाकार कमेंट्स करत सुष्मिता सेनला पाठिंबा दिला. आता या यादीत बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आणि मॉडल उर्फी जावेद हीने सुद्धा सुष्मिता सेनला पाठिंबा दिला आहे.

उर्फी जावेदने केली सुष्मिता सेनची पाठराखण
उर्फी जावेदने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की, सुष्मिता सेन आधीपासूनच एक श्रीमंत स्त्री आहे. मला एक कळत नाही हे लोक त्यांना गोल्ड डिगर का म्हणत आहेत. त्या एका अशा पुरूषाला डेट करत आहेत, जो त्यांच्यापेक्षा थोडा श्रीमंत आहे. लोक त्यांना विनाकारण ट्रोल करत आहेत. असं बऱ्याचदा होतं. जर एखादा पुरूष श्रीमंत त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत महिलेला डेट करत असेल तर कोणी काहीही बोलत नाही. सुष्मिता सेन स्वतःसाठी कमावू शकत नाहीत का? असं अनेक वर्षांपासून होतं, महिलांना नेहमी सॉफ्ट टारगेट बनून राहतात.

या कलाकारांनी सुद्धा केलं सुष्मिता सेनचं समर्थन

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता सेनने शेअर केलेल्या पोस्टवर बॉलिवूड कलाकारांनी तिचे समर्थन केले होते. प्रियांका चोपडाने यावर लिहिलं की, हिला राणी म्हणा! तर सुनील शेट्टीने टाळ्या वाजणारी इमोजी पाठवलेला होता. तसेच रणवीर सिंहने हार्ट इमोजी पाठवलेली होती.या प्रकारे अनेक कलाकारांनी सुष्मिता सेनला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, गेल्या गुरूवारी ललित मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुष्मिता सोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. त्यावेळी प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता. त्यावेळी अनेकजण दोघांनी लग्न केलं असंही म्हणत होते. मात्र, त्याचवेळी आणखी एक पोस्ट करत ललित मोदी यांनी आम्ही फक्त एकमेकांना डेट करत आहोत हे स्पष्ट केलं होतं.


हेही वाचा :अमिताभ बच्चन यांची अतरंगी फॅशन पाहून ट्रोलर्सनी उडवली खिल्ली; रणवीर सिंहसोबत केली तुलना