मेहंदी सोहळ्यात बॉलिवूड गाण्यावर थिरकली अंबानींची धाकटी सून; व्हिडीओ व्हायरल

भारतातील मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या कुटु्ंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी वधू राधिका मर्चंटसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अनंत आणि राधिकाचा साखरपुडा राजस्थानमध्ये पार पडला होता. दरम्यान, अशातच आता अंबानींच्या सूनेच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.

गुलाबी लेहंग्यात सजली अंबानींची नवी सून

jagranराधिकाने मेहेंदीसाठी खास गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे सोबतच तिने डायमंड ज्वेलरी देखील परिधान केली आहे. मेहंदी सोहळ्या दरम्यान राधिकाने ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर सुंदर नृत्य देखील केलं.
राधिका एक उत्तम नृत्यांगणा असून तिने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे तिच्या सुंदर नृत्याने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं.सध्या राधिकाचे फोटो आणि हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Ambani (@akashambani_fc)

दरम्यान, अनंत आणि राधिका मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. काही महिन्यांपूर्वीच अंबानी कुटुंबाकडून राधिकाची‘अरंगेत्रम सेरेमनी’देखील करण्यात आली होती.

Anant Ambani-Radhika Merchant get engaged, participate in raj-bhog-shringaar ceremonies at Shrinathji Temple | Lifestyle News,The Indian Expressराधिका ही विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन हे एका हेल्थकेअरचे सीइओ आहेत. राधिकानं पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्समध्ये ग्रँज्युएशन केले असून 2017 मध्ये तिने इसप्रावा टीममध्ये एक सेल्स एक्झुकेटिव्ह म्हणून काम केले होते. राधिका आणि अनंत हे लहानपणापासूनचे मित्र आहेत.

 


हेही वाचा :

सोनू सूद झाला देवदूत; दुबई एअरपोर्टवरील व्यक्तीचा वाचवला जीव