घरमनोरंजनपुरग्रस्तांच्या मदतीसाठी अमेय वाघ करणार 'दळण'चा प्रयोग

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अमेय वाघ करणार ‘दळण’चा प्रयोग

Subscribe

या नाटकाद्वारे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला जाणार आहे.

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हाजारो कुटुंब आणि त्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीचे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील नाटक कंपनीच्या ‘दळण’ या नाटकाच्या खास प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाच्या प्रयोगाने पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. या नाटकाद्वारे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला जाणार आहे.

- Advertisement -

नाटक कंपनीची संपुर्ण टीम आणि नाटकातले सर्व कलाकार पुढे सरसावले असून, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, येथे दिनांक २८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता ‘दळण’ चा खास प्रयोग सादर करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वाधिक संख्येने नाटक पहावयास येण्याचे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले आहे.

”दळण या नाटकाची तिकीट सर्वांनी विकत घ्यावी, जेणेकरून त्यातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी उपयोगी पडेल. ज्य़ांना नाटकाच्या प्रयोगाला येणे शक्य नाही, त्यांनी तिकीट विकत घेऊन ते दुसऱ्यांना द्यावे. आपल्या या एका-एका तिकीटातून पूरग्रस्तांना मदत होणार आहे. – अमेय वाघ ”

या नाटकामध्ये निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित अभय महाजन व रोहित निकम लिखित या नाटकात अमेय वाघ, अलोक राजवाडे, ऋचा आपटे, अमृता भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -