घरमनोरंजनAmruta Fadnavis BirthDay: देवेंद्र फडणवीसांनी फिल्मी स्टाईलने केलं होतं अमृतांना प्रपोज; वाचा...

Amruta Fadnavis BirthDay: देवेंद्र फडणवीसांनी फिल्मी स्टाईलने केलं होतं अमृतांना प्रपोज; वाचा ‘हा’ भन्नाट किस्सा

Subscribe

अमृता फडणवीस यांचा आज 44 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फिल्मी स्टाईलने केलेल्या प्रपोजचा भन्नाट किस्सा जाणून घेऊया.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यापलिकडे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्या अनेक विषयांवर आपली परखड मतं मांडत असतात.

अमृता फडणवीस यांचा जन्म 9 एप्रिल1979 साली झाला. अमृता या नेहमीच त्यांच्या पतीच्या बाजूने ठामपणे उभे राहताना आपण पाहिल्या आहेत. तसेच, अनेकदा त्यांचे नेत्यांसोबत झालेले ट्वीटर वाॅरही पाहायला मिळतात. अमृता फडणवीस या गायिका तसेच समाजसेविका आहेत. अशा अमृता फडणवीस यांचा आज 44 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फिल्मी स्टाईलने केलेल्या प्रपोजचा भन्नाट किस्सा जाणून घेऊया.  (Amruta Fadnavis BirthDay Devendra Fadnavis proposed to Amruta in filmy style know in detail  )

- Advertisement -

कधीही लग्न करायचे नाही असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देव, देश आणि धर्मासाठी संपूर्ण जीवन वाहून घेण्याच्या विचारात ते होते. मात्र, एकेदिवशी देवेंद्र फडणवीस यांना अमृता रानडेंचं स्थळ आलं आणि फडणवीसांनी त्यांचा निर्णय बदलला. देवेंद्र फडणवीस यांनी अमृता यांना पहिल्याच भेटीत एक फिल्मी लाईन ऐकवली होती.

….अन् फडणवीसांनी लग्नाचा निर्णय घेतला

देवेंद्र फडणवीस यांच्या आई सईताई यांना देवेंद्र यांनी घेतलेला निर्णय मान्य नव्हता. फडणवीस जेव्हा दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांच्या आईने स्थळ शोधण्यास सुरुवात केली. लग्न करण्याबाबत आईच्या आग्रहामुळे त्यांनी दोन-चार फोटो पाहण्यासही होकार दिला होता. त्यावेळी फडणवीसांच्या आईच्या नजरेत डाॅक्टर चारुलता आणि शरद रानडे यांच्या कन्या अमृता आल्या होत्या. अमृता यांचा फोटो फडणवीसांनी पाहिला, त्यांचा नंबरही त्यांनी घेतला आणि गाठीभेटी वाढल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

( हेही वाचा: Health Tips : पोळी की भात? हेल्दी राहण्यासाठी काय खाणं अधिक फायदेशीर )

तुम्ही काजोलसारख्या दिसता

देवेंद्र फडणवीस जेव्हा अमृता यांना भेटले तेव्हा पहिल्याच भेटीत त्यांनी तुम्ही काजोलसारख्या दिसता, काजोल माझी फेवरेट आहे , असे फिल्मी वाक्य म्हटले होते. कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला फडणवीस अमृता यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपला संसार थाटला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -