घरमनोरंजनअर्जुन कपूर सुपर स्प्रेडर ? ४ मित्रही कोरोना पॉझीटीव्ह

अर्जुन कपूर सुपर स्प्रेडर ? ४ मित्रही कोरोना पॉझीटीव्ह

Subscribe

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून त्याची बहीण अंशुला हीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. दोघा बहीण भावांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरातच क्वारनटाईन आहेत. मात्र याच दरम्यान, अर्जुनच्या संपर्कात आलेल्या चार मित्रांनाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अर्जुन तर सुपर स्प्रेडर नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच अर्जुनला ओमीक्रॉन तर झाला नाही  ना याची खात्री करण्यासाठी त्याची कोरोना जिनोम सिक्वेवन्सिंग करण्यात येणार असल्याचे समजते.

बीएमसीने अर्जुनच्या संपर्कात आलेल्या २५ जणांची हाय रिस्क कॉन्टेक्ट यादी बनवली आहे. यादीतील सर्वच जणांची कोरोना चाचणी करण्यात येत असून यातील चार जण कोरोना पॉझीटीव्ह झाल्याचे आढळले आहेत. विशेष म्हणजे हे चारही जण अर्जुनचे जवळचे मित्र आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि अंशुला बीकानेरला गेले होते. तिथून परतल्यावर दोघांना सर्दी , खोकला आणि ताप आल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यात अर्जुन आणि अंशुला यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर बीएमसीने अर्जुन राहत असलेली इमारत सॅनिटाईज केली. तसेच ओमीक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता अर्जुन आणि अंशुलाच्या संपर्कात आलेल्या २५ जणांची यादी केली. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान यातील चार जणांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. यामुळे ज्यांचे रिपोर्ट अजून आले नाहीत त्यांची पुरती झोप उडाली आहे. अर्जुनेन सोशल मीडियावर आपण पॉझीटीव्ह झाल्याची माहिती दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -