घरपालघरउद्यानासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा; तीन वर्षांपासून उद्घाटनच्या प्रतिक्षेत

उद्यानासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा; तीन वर्षांपासून उद्घाटनच्या प्रतिक्षेत

Subscribe

वनविभाग डहाणूमधील कासा वनपरिक्षेत्र अंतर्गत चारोटी येथे २०१६ मध्ये आदर्श सांसद ग्राम योजना अंतर्गत निसर्ग पर्यटन स्थळ चारोटी उद्यान मंजूर करण्यात आले होते.

वनविभाग डहाणूमधील कासा वनपरिक्षेत्र अंतर्गत चारोटी येथे २०१६ मध्ये आदर्श सांसद ग्राम योजना अंतर्गत निसर्ग पर्यटन स्थळ चारोटी उद्यान मंजूर करण्यात आले होते. २०१६ ला मंजूर झालेले निसर्गपर्यटन स्थळ २०१७-१८ ला पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु आजतागायत हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्यान बंद असल्याने त्याची दुरवस्था झाली असून कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचे दिसून येत आहे. डहाणू तालुक्यातील चारोटी येथे आदर्श सांसद ग्राम योजना अंतर्गत निसर्ग पर्यटनस्थळ उद्यान मंजूर करण्यात आले होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत गुलजारी नदीच्या काठावर पर्यटनस्थळ निर्मितीची योजना आखण्यात आली होती. या उद्यानाचे काम पूर्ण होऊनही उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. मध्यंतरी कोरोनाचे कारण सांगत वनविभागाने विषय टाळला होता. परंतु आता सर्वत्र निर्बंध शिथिल झालेले असताना देखील उद्यान चालू करत नसल्यामुळे परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

तब्बल १ कोटी ८० लाख इतका निधी खर्च करून चारोटी येथे अस्तित्वात असलेल्या बागेचे निसर्ग पर्यटनस्थळ उद्यानामध्ये रूपांतर केले गेले आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या बागेच्या चारही बाजूला भिंतीचे कुंपण घालून मधल्या भागात काही सजावटी केल्या व लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. एकूणच परिस्थिती पाहता या उद्यानासाठी संपूर्ण निधी खर्च झाल्याचे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र उद्यानावर तेवढा निधी खर्च झाल्याचे जाणवत नाही. उद्यान निर्मिती वेळेस वेळोवेळी अनेक वृत्तपत्र व जाणकारांनी उद्यानाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. परंतू तत्कालीन जबाबदार यंत्रणेने सर्वांनाच बगल देत उद्यानाबाबतची माहिती गुलदस्त्यात ठेवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

चारोटी निसर्ग पर्यटनस्थळ उद्यानाचे काम पूर्ण होऊन देखील उद्यान नागरिकांसाठी बंदच ठेवण्यात आले आहे. उद्यान खुले झाल्यास परिसरातील आबालवृद्धांना विरुंगळ्यासाठी उद्यानाचा उपयोग होईल. उद्यान खुले होत नसल्यामुळे परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे.
– कैलास चौरे, उपसरपंच, ग्रामपंचायत, चारोटी

योजनेचे काम पूर्ण होऊन जवळपास ३ वर्षाचा काळ उलटला असला तरी उद्यान मात्र सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. सोबतच शासकीय निधी खर्च करून बागेसाठी जे साहित्य उपलब्ध करण्यात आले होते. ते देखील डागडुजी अभावी जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. उद्यानाबाहेर व आतमध्ये साफसफाई अभावी गवत व झाडे वाढली असून उद्यानाचे विद्रुपीकरण झाले आहे. शासकीय निधी खर्च होऊन देखील त्याचा उपयोग जनसामान्यांना होत नसेल तर हा शासकीय निधीचा अपव्ययच होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. निसर्गपर्यटन स्थळाविषयी वनपरिक्षेत्र कासा येथील वनक्षेत्रपाल एस. पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी डहाणू वनविभागाला संपर्क करा, असे उत्तर देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर वनविभागाचे अधिकार्‍यांनी काहीही माहिती देण्यास टाळाटाळ केली.

- Advertisement -

(कुणाल लाडे – हे डहाणूचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा – 

corona positive : हिवाळी अधिवेशनानंतर भाजपचे दोन नेते कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -