घरमनोरंजनजान्हवीसाठी अर्जुनचं भावनिक पत्र

जान्हवीसाठी अर्जुनचं भावनिक पत्र

Subscribe

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरच्या ‘धडक’चं ट्रेलर येण्याआधी जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर यानं तिच्यासाठी भावनिक पत्र लिहिलं असून ट्विट केलं आहे. श्रीदेवीच्या अचानक मृत्युनंतर आपले वडील बोनी कपूर आणि आपल्या दोन्ही सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी यांना अर्जुननं मोठ्या भावाप्रमाणे आधार दिला आणि श्रीदेवीच्या निधनानंतर त्यांच्यातील संबंध सुधारले.

बहिणीला दिला सल्ला

आपल्या बहिणींवरील प्रेमाचा प्रत्यय पुन्हा एकदा अर्जुननं दिला आहे. जान्हवीचा पहिलाच चित्रपट येणार असून त्याबद्दलच्या भावना अर्जुननं आपल्या ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत. ‘उद्यापासून तू कायमस्वरुपी प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग बनणार आहेस. सर्वात आधी मला माफ कर कारण मी मुंबईत नाही, पण नेहमीच तुझ्याबरोबर आहे, काळजी करू नकोस.’ अशा शब्दात त्याच्या मनातील जान्हवीबद्दलच्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या. इतकंच नाही तर हे क्षेत्र कसं आहे हेदेखील त्यानं तिला भावनिक शब्दात सांगितलं, ‘तू मेहनत केलीस, प्रामाणिक राहिलीस, प्रशंसेने हुरळून न जाता त्यातून शिकलीस, सल्ल्याचा आदर कर, पण स्वतःचा रस्ता स्वतः निवड आणि स्वतःचं मत बनव. हे सोप्पं नसेल पण या सगळ्यासाठी तू नक्कीच तयार आहेस.’

- Advertisement -

आधुनिक काळातील रोमिओ आणि ज्युलिएट

आधुनिक काळातील रोमिओ आणि ज्युलिएट असं इशान खट्टर आणि जान्हवीला संबोधून अर्जुननं आपल्या ट्विटमधून दोघांनाही त्यांच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय शशांक खेतान आणि करण जोहर यांचे आभारदेखील त्यानं मानले आहेत.

अर्जुन जान्हवीच्या मागे खंबीरपणे उभा

श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुननं जान्हवी आणि खुशीला आपला पूर्ण पाठिंबा दिला. जान्हवीच्या मागे तो भाऊ म्हणून उभा तर राहिलाच. शिवाय या दुःखातून बाहेर येण्यासाठीदेखील त्यानं तिला मदत केली. मनात कोणताही किंतु न ठेवता त्यानं आपलं कर्तव्य बजावलं. सध्या अर्जुन ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून ‘धडक’च्या ट्रेलर लाँचला उपस्थित राहू न शकल्यामुळं त्यानं ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -