घरताज्या घडामोडीAtrangi Re: सारा म्हणतेय अक्षय 'उत्तरेचा थलायवी' तर धनुष...

Atrangi Re: सारा म्हणतेय अक्षय ‘उत्तरेचा थलायवी’ तर धनुष…

Subscribe

अक्षय आणि धनुष यांच्यासोबत काम करण्याची अनुभव मला आयुष्यभर पुरणारा

बॉलिवूडमध्ये सारा,धनुष,आणि सारा अली खान यांच्या अतरंगी रे या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची गाणी रिलीज झाली आहेत. गाणी देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत. सारा,धनुष आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आगेत. त्यामुळे या तिघांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकही तितकेच खुश आहेत. नुकतंच साराने एका मुलाखतीत तिचे सिनेमातील अनुभव शेअर केलेत. साराने अक्षय आणि धनुष यांच प्रचंड कौतुक केलं आहे.

या वेळी माध्यमांशी बोलताना सारा म्हणाली अक्षय आणि धनुष यांच्यासोबत काम करण्याची अनुभव मला आयुष्यभर पुरणारा आहे. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, अक्षय कुमार हा उत्तरेचा थलायवी आहे. त्याच्यासोबत काम करताना फार मजा आली. तो उत्तरेचा थलायवी आहे कारण त्याच्याकडे तितकी ऊर्जा,सहजता आणि स्पार्क आहे.

- Advertisement -

तर धनुष विषयी बोलताना सारा म्हणाली, धनुष हा एक प्रेरणा स्रोत आहे. तो अभिनयाची एक भरलेली संस्था आहे. एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेला धनुष कॅमेरासमोर उभा राहतो तेव्हा त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारख असतं.

सारा पुढे म्हणाली, सेटवर काम करताना एकही दिवस असा नव्हता की ज्या दिवशी दोघांकडून मला नवीन शिकायला मिळालं नाही. जर सात ते सात अशी शिफ्ट असली की दुपारी जेवल्यानंतर माझी शिफ्ट संपायची त्यानंतर मी पॅक अप करुन रुम न जाता मॉनिटरवर जाऊन धनुष कशाप्रकारे टेक करतो हे पाहायचे.

- Advertisement -

सिनेमातील चका चका आणि रेत सी रे ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. दुसऱ्या गाण्यातून सारा आणि धनुष यांची लव्ह स्टोरी सांगण्यात आली आहे. सिनेमात प्रेक्षकांना प्रेमाचा लव्ह ट्रॅगल पहायला मिळणार आहे. सारासोबत धनुष रोमान्स करताना देखील दिसत आहे.  सिनेमा २४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे डिज्नी प्लस हॉटस्टारवर देखील पाहता येणार आहे.


हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -