घरमनोरंजनBig Boss 14: निक्की तंबोलीने देवोलीन वर केला Me Tooचा आरोप

Big Boss 14: निक्की तंबोलीने देवोलीन वर केला Me Tooचा आरोप

Subscribe

टास्कच्या दरम्यान देवोलीना ने निक्कीला धमकीही दिली होती, की जर ती घरातून बाहेर गार्डन एरियामध्ये नाही आली तर ती स्वत: घरात जाईल. यानंतर निक्की आणि देवोलीना यांच्यात वादाला सुरूवात सुरुवात झाली.

सध्या बिग बॉस १४ ची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यात आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीची दमदार एंट्री झाली आहेय. एजाज खान हिच्या जागी देवोलीनाची एंट्री करण्यात आली आहे. देवोलीना बिग बॉसच्या घरात येताच तिने जोरदार टास्क खेळायला सुरूवात केली आहे. याच दरम्यान निक्की तंबोली आणि देवोलीनमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळाली. दोघींनी ही एकमेकींची चांगलीच शाळा घेतलेली पहायला मिळाली.

टास्कसाठी बिग बॉसच्या घरातील सदस्य वेगवेगळ्या टिममध्ये होते. या टास्क नंतर निक्की आणि देवोलीनमध्ये जोरदार भांडणाला सुरुवात झाली. देवोलीने निक्की तंबोलीला घरात कॉफी पिताना पाहिले आणि त्यांच्या भांडणाला सुरुवात झाली. त्यांच्यातील भांडणे एतक्या टोकाला गेली की दोघी एकमेकिंच्या अंगावर जोरजोरात ओरडू लागल्या. टास्कच्या दरम्यान देवोलीना ने निक्कीला धमकीही दिली होती, की जर ती घरातून बाहेर गार्डन एरियामध्ये नाही आली तर ती स्वत: घरात जाईल. यानंतर निक्की आणि देवोलीना यांच्यात वादाला सुरूवात सुरुवात झाली. या भांडणात दोघींनी त्यांच्या वयक्तिक गोष्टीवर बोलायला सुरुवात केली. ‘या लोकांचे काही व्यक्तिमत्त्व नाहीय, हे इथे ते दाखवतात. लाज वाटायला पाहिजे तुम्ही मी टूच्या दोषी आहात’, असे निक्कीने देवोलीना म्हटले. यावर चिडून देवोलीनाने ‘तु जर हे सिद्ध करु शकलीस तर मी माझ्या आई वडिलांचे नाव बदलेन’, असे सडतोड उत्तर देवोलीना ने निक्कीला दिले.

- Advertisement -

एवढेच नाही तर देवोलीनाने निक्कीवर असाही अरोप केला की, ‘ही जरी रुबिना सोबत असली तरी तरी ती तिच्या विरोधात बोलत असते. रुबिनाच्या फॅन्सनी निक्कीला पसंत करावे आणि तिला तिच्याइतकी मिळावी म्हणून ती तिच्या सोबत असते’, असे देवोलीन सांगितले. निक्की रुबिनाचा फक्त प्रसिद्धीसाठी वापर करतेय असेही ती म्हणाली.


हेही वाचा – रणवीरने शेअर केला अतरंगी फोटो, म्हणे ‘मी तर फुलदाणी’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -