घरमनोरंजनBigg Boss Marathi 3 : कीर्तनकार शिवलीला पाटील 'बिग बॉस 'च्या घरातून...

Bigg Boss Marathi 3 : कीर्तनकार शिवलीला पाटील ‘बिग बॉस ‘च्या घरातून बाहेर

Subscribe

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी ३’ च्या तिसऱ्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. अशातच स्पर्धकांची भांडणं आणि कुरघोड्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोची चांगलीच चर्चा रंगत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनचं प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यंदा कलाकार, सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते अगदी कीर्तनकारांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या या पर्वाच्या सुरुवातीलाच दोन सदस्यांची नावं चांगलीच गाजली, ती म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कीर्तनकार शिवलीला पाटील. दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील या महिलांनी पहिल्या दिवसापासूनचं एकमेकांविरोधात बोलण्यास सुरुवात केली. अशातच अचानक शिवलीलाची प्रकृती बिघडली. त्यामुळे बिग बॉसच्या आदेशानुसार वैद्यकीय उपचारांसाठी काही काळ तिला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं आहे.

त्यामुळे बुधवारपासून व्होटिंग लाईन्स बंद करण्यात आल्या आहेत. यापूर्वी बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केलं होतं. घरातील कामांमध्ये अपुरे योगदान, घरातील वावर, टास्कमधील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास कमी पडल्याच्या निकषांवर त्यांना नॉमिनेट करण्यात आले. यामध्ये शिवलीलाचाही सहभाग होता.

- Advertisement -

मात्र प्रकृतीच्या कारणामुळे तिला कोणताही टास्क खेळण्यासाठी बिग बॉसने मज्जाव केला. अशातच आता तिला उपचारांसाठी घराबाहेर जावे लागले. मात्र लवकरंच ती बरी होऊन पुन्हा बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे. १४ स्पर्धकांमध्ये युवा कीर्तनकार म्हणून शिवलीला पाटीलने बिग बॉस मराठी ३ च्या घरात एंट्री घेतली. मात्र आपल्या किर्तनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिवलीलाचे बिग बॉसच्या घरात येणे तिच्या चाहत्यांना रुचलेले नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -