घरताज्या घडामोडीरेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड अखेर उतरवला

रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड अखेर उतरवला

Subscribe

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड आज महापालिकेने उतरवला आहे.

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेने सील केला होता. त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पालिकेकडून ही कार्यवाही करण्यात आली होती. तसेच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेट झोनचा बोर्ड देखील लावण्यात आला होता. मात्र, हा बोर्ड मुंबई महापालिकेने आज उतरवला आहे. ११ जुलै रोजी हा बंगला सील करण्यात आला होता. आता या बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला ११ जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर महापालिकेने रेखा यांचा बंगला सील केला होता. त्याचसोबत बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असा फलकही लावण्यात आला होता. जो फलक आज उतरवण्यात आला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. बंगल्यात दोन सुरक्षारक्षक असतात. त्यापैकी एकाला करोनाची लागण झाली. संबंधित सुरक्षारक्षकावर उपचार सुरू करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसर सॅनिटाइझही केला. आता कंटेन्मेंट झोनचा हा फलक उतरवण्यात आला असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रतीक्षा मुणगेकर दिसणार ‘कोर्टयार्ड ७०४’ मध्ये!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -