घरताज्या घडामोडीघटस्फोटानंतर आमिर-किरण 'लाल सिंह चड्ढा'च्या सेटवर दिसले एकत्र; पाहा व्हायरल सेल्फी

घटस्फोटानंतर आमिर-किरण ‘लाल सिंह चड्ढा’च्या सेटवर दिसले एकत्र; पाहा व्हायरल सेल्फी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दोघांना घटस्फोट घेऊन आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. मागच्या शनिवारी म्हणजेच ३ जुलै दोघांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. या बातमीनंतर चाहत्यांना धक्का बसला. लग्नाच्या १५ वर्षांनंतर आमिर खान आणि किरण राव यांनी विभक्त व्हायचे ठरवले. जरी ते दोघे वेगळे झाले असेल तरी मुलगा आजादला एकत्र मिळून सांभाळणार आहेत आणि एकत्र काम देखील करणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आमिर आणि किरण एकत्र काम करण्यास तयार झाले आहेत. सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमिरसोबत किरण आणि अभिनेता नागा चैतन्य दिसत आहे.

- Advertisement -

 

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya)ने शुक्रवारी आपल्या सोशल मीडियावर आमिर खान (Aamir Khan)चा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal singh Chaddha) चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केला. चैतन्य देखील या चित्रपटात दिसत आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग लडाखमध्ये होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत आमिर खान आणि किरण राव दिसत आहे. पुन्हा आमिर आणि किरण यांना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काही चाहत्यांनी कौतुक केले आहे.

- Advertisement -

घटस्फोटानंतर आमिर आणि किरण शूटिंगदरम्यानच्या या फोटोमध्ये एकत्र दिसत आहे. काही माध्यमाच्या वृत्तानुसार, चैतन्यला अभिनेता विजय सेतुपतिच्या जागी सामील केले आहे. चैतन्य चित्रपटात आमिर खानच्या जवळच्या मित्राची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नागा चैतन्यने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘आभारी आहे.’

‘लाल सिंह चड्ढा’ टॉम हँक्सचा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. माहितीनुसार, या चित्रपटासाठी ४५ दिवसांचे शेड्यूल केले गेले आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये करीना कपूर प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वैत चंदन यांच्यावर आहे.


हेही वाचा – अनुष्का-विराटच्या नव्या व्हिडिओमध्ये दिसला वामिकाचा स्लीपिंग मॅट; सोशल मीडियावर झाला व्हायरल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -